Breaking

Friday, September 16, 2022

गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, एलन मस्क आणि अदानींमध्ये किती अंतर? https://ift.tt/nNPsKfH

मुंबई : भारतातील उद्योगपतींशी आता कोणी पंगा घ्यायचा नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. कारण भारतीय उद्योगपती हे फ्रान्सचे बर्नार्ड अर्नोल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी समूहाच्या संपत्तीत शुक्रवारी ५ अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याने अदानींची संपत्ती आता १५५.७ अब्ज डॉलर्स म्हणजे १२.३७ लाख कोटी इतकी झालीये. अदानी समूहाचे कर्ज २.२ लाख कोटी रुपयांवरून २.६ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले असतानाच अदानींची संपत्ती एवढी कशी झाली? अदानी यांच्या संपत्तीचं नेमकं रहस्य काय आणि त्यांनी जगातील दुसऱ्या क्रमाकांचा श्रीमंती व्यक्ती होण्याचा मान कसा पटकावलाय हे जाणून घेणं आवश्यक आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलियनेअर्स इंडेक्सच्या रिपोर्टनुसार अदानींनी बर्नार्ड अर्नोल्ट आणि जेफ बेझोस यांना मागे टाकलं आहे. अदानी समूहाच्या संपत्तीत शुक्रवारी ५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. अदानींची संपत्ती आता सुमारे १५५.७ अब्ज डॉलर्स (१२.३७ लाख कोटी) एवढी झाली आहे. टेस्लाचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत एलन मस्क पहिल्या क्रमांकावर आले आहेत. एलन मस्क यांची संपत्ती अंदाजे २७३.५ (२१.८० लाख कोटी) अब्ज डॉलर इतकी आहे. अदानी आणि मस्क यांच्यात एकूण ११८.८ (९.७७ लाख कोटी) अब्ज डॉलरचे अंतर आहे. अदानींच्या श्रीमंती मागचं कारण काय? अदानींनी अलिकडच्या वर्षांत आपला व्यवसाय लक्षणीयरीत्या वाढवला आहे. यात अदानींचा देशातील दुसरा आणि सर्वात मोठा समूह म्हणून ओळखला जातो. प्रामुख्याने सिमेंट, अॅल्युमिनिअम, डेटा सेंटर व्यवसायात अदानी समूहाचा मोठा वाटा आहे. खाजगी क्षेत्रातील बंदर, विमानतळ ऑपरेटर क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा वाटा आहे. सिटी गॅस वितरण आणि कोळसा खाणकामात क्षेत्रातही पहिल्या क्रमांकावर आहे. यात एकूण गॅस ३७%, पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन ६५% तर ग्रीन एनर्जीचा ६१% हिस्सा आहे. अदानी समूहाकडून हरित ऊर्जेवर ७० अब्ज डॉलर गुंतवणूकीची घोषणा करण्यात आली आहे. गौतम अदानी इथपर्यंत कसे पोहचले? १९६२ ला गौतम अदानी यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबादला झाला. १९८० ला अहमदाबादहून वीस वर्षांचे गौतम अदानी मुंबईत आले. हिरे व्यापारासाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार त्यांनी गाठला. पहिली दोन-तीस वर्षं हिरे वेचण्याचं काम करत असतानाच त्यांनी स्वत:ची हिरे ब्रोकरेज कंपनी थाटली.१९८१ ला त्यांच्या भावाने प्लास्टिक व्यवसाय सुरू केला, मदतीसाठी ते अहमदाबादला परतले. त्यांनी प्लास्टिक व्यवसायाला पॉलीमर आणि पीव्हीसी आयात करणाऱ्या कंपनीमध्ये बदललं. १९८८ ला अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीची स्थापना केली. १९९१ पासून अदानींनी ७८ बिलियन अमेरिकन डॉलरचं साम्राज्य उभं केलं. १९९५ ला मुंद्रा बंदराची व्यवस्था सांभाळण्याचं खाजगी कंत्राट गुजरात सरकारने काढलं, ते अदानींनाच मिळालं. तेव्हा अदानी पोर्ट्स ही देशातली सगळ्यात मोठी खासगी बंदर व्यवस्थापन कंपनी होती. १९९६ मध्ये अडाणी पॉवर ही कंपनी देशातली सगळ्यात मोठी खासगी उर्जा निर्मिती करणारी कंपनी होती. २००१ ला गुजरात दंगलीनंतर राज्यात उद्योगधंद्यांना अनुकूल वातावरण नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत गौतम अदानी तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बाजूने उभे राहिले. २००७ ला अदानी समूहाकडून भारतात व्यवसाय करायला सुरूवात झाली. २००८ च्या मुंबई हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये ते उपस्थित होते, मात्र सुखरूप बचावले. २००८ ला त्यांचं औद्योगिक साम्राज्य ८ अब्ज अमेरिकन डॉलर इतकं होतं. २०१२ पासून त्यांच्या कंपन्यांचे शेअर अगदी सरळ रेषेत वर चढले. २०१४ नंतर मोदी सत्तेत आल्यानंतर अडाणी यांची संपत्ती वाढली. २०१५ ला कंपनीने उडुपी औष्णिक उर्जा प्रकल्प ६,३०० कोटी रुपयांना विकत घेतला. त्या वाटाघाटी फक्त 100 तासांत संपवण्याचा रेकॉर्ड अदानींनी केला. अब्जाधीशांच्या यादीत असलेल्या अदानींचा एंटरप्रायझेस शेअर्समध्ये मोठा वाटा आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार त्यांची एकूण संपत्ती १४९ अब्ज डॉलर झाली आहे. अदानीच्या एकूण संपत्तीत यावर्षी ७२.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. एप्रिल २०२० पासून अदानी समूहाचे काही समभाग १,००० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. शेअर्सच्या वाढीमुळे या कंपनीचे मार्केट कॅप ४.३१ ट्रिलियन रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे अदानींच्या संपत्तीत यावर्षी जानेवारीपासून ६०.९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/zo3C2S9

No comments:

Post a Comment