Breaking

Monday, September 12, 2022

अनिल परब यांच्या अडचणी वाढणार?; ३० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे आदेश https://ift.tt/otF8L3Y

दापोली : माजी मंत्री () यांचा संबंध असल्याचा आरोप असलेले (Sai Resort) तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. रिसॉर्ट तोडण्यासाठी चिपळूनच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर निविदा मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान, या दोन्ही रिसॉर्ट प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा व सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई व्हावी यासाठी दापोली कोर्टात आज १२ सप्टेंबर रोजी सोमवारी सुनावणी झाली. यावेळी दापोली कोर्टाने दापोली पोलिस निरीक्षकांनी याप्रकरणी चौकशी करून पुढील तीस दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही माहिती केंद्रीय पर्यावरण खात्याचे वकील अ‍ॅड.प्रसाद कुवेसकर यांनी दिली. यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (The court has ordered that an inquiry should be made in the case and a report should be submitted within the next 30 days) दापोली तालुक्यात मुरूड समुद्र किनारा सीआरझेड-३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय पर्यावरण खात्याने हा दावा दापोली कोर्टात दाखल केला आहे. साई रिसॉर्टचा आरोप असलेले शिवसेना नेते अनिल परब,साई रिसॉर्ट व सी काँच या तिघांविरुद्ध हा फौजदारी खटल्याचा दावा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या () यांनी या प्रकरणात गेले वर्षभर केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करत हे रिसॉर्ट तोडावे व अनिल परब यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी वेळोवेळी केली होती. उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे घोटाळयांचे साई रिसॉर्ट हे स्मारक तुटणार व सगळ्या प्रश्नांची उत्तरे अनिल परब यांना दयावी लागतील असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. अवघ्या राज्यात बहूचर्चीत व वादग्रस्त ठरलेल्या अनिल परब यांच्यावर आरोप असलेल्या साई रिसॉर्ट व सी काँच रिसॉर्ट पडण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु झाली आहे. चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. मौजे मुरूड ता. दापोली येथील स.नं. ४४६ मधील साई रिसॉर्ट एनएक्स व सी. कौंच रिसॉर्ट बांधकामा व इमारती करिता पुरविलेल्या सोईसुविधा निष्कासन करणे व त्यानुषंगाने निर्माण होणारी संभाव्य मोडतोड आणि इतर सामग्री योग्यरितीने गोळा करून विल्हेवाट लावणेसाठीचे व वापरात येणाऱ्या साहित्यांचे मूल्यांकन करणे, तसेच स.नं. ४४६ मध्ये अस्तित्वात असलेल्या इमारती व इतर बाबी सविस्तर नकाशे (Drawing) ५ प्रतीत तयार करून त्याला सक्षम प्राधिकरणाची मान्यता घेणे याकरिता योग्य त्या सल्लागाराची नियुक्ती करणेकरीता दरपत्रक मागविणेत आले आहे. दरम्यान, अनिल परब यांनी याप्रकरणात आपला कोणताही सबंध नसल्याचे स्पष्ट केले असून किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. यापूर्वी या सगळ्या प्रकरणी ईडीकडूनही अनिल परब व काही जणांची चौकशी करण्यात आली होती.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/DZz9oSH

No comments:

Post a Comment