Breaking

Sunday, September 11, 2022

आशिया चषक जिंकणारा संघ होणार मालामाल, किती करोडो रुपये मिळणार जाणून घ्या.... https://ift.tt/RAeDPUz

दुबई : आशिया चषक स्पर्धा चांगलीच गाजली. पण ही स्पर्धा आता जो संघ जिंकेल, त्यांना किती करोडो रुपये मिळतील, ही गोष्ट आता समोर आली आहे. कारण जो संघ या स्पर्धएत बाजी मारेल तो चांगलाच मालामाल होणार आहे. आशिया चषक २०२२च्या चॅम्पियन आणि उपविजेत्या संघांना किती बक्षीस रक्कम मिळेल याची माहिती आता समोर आली आहे. हा चषक जिंकणाऱ्या विजेत्या संघाला १,५९,५३,०००रुपये (अंदाजे) इतकी मोठी रक्कम मिळेल. स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ७९,६६, ००० रुपयांचा धनादेश दिला जाईल. पाकिस्तानने २०१२ मध्ये आशिया चषक जिंकला होता, तर श्रीलंकेने २०१४ मध्ये अखेरचा ट्रॉफी जिंकला होता. या दोन संघांपैकी एक संघ चॅम्पियन होईल, पण दोन्ही संघ बऱ्याच वर्षांनी जेतेपद पटकावणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हे जेतेपद महत्वाचे असेल. कारण जो संघ ही स्पर्धा जिंकेल, त्याचा फायदा त्यांना ट्वेन्टी-२० विश्वचषकात होऊ शकतो. सुपर फोरच्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभूत होऊनही, पाकिस्तानने फायनलमध्ये फेव्हरेट म्हणून प्रवेश केला आणि त्यांची १० वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येईल. श्रीलंकेने ही स्पर्धा जिंकली तर विश्वचषकापूर्वी त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आशिया चषक २०२२ च्या अंतिम फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने आले आहेत. लीग स्टेजमध्ये थोडासा संघर्ष केल्यानंतर, दोन्ही संघांनी सुपर फोरमध्ये पुनरागमन केले आणि गतविजेत्या भारताचाही पराभव केला. श्रीलंकेने स्पर्धेची विस्मरणीय सुरुवात केली आणि सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेने साखळी फेरीतील त्यांच्या शेवटच्या सामन्यात बांगलादेशचा २ विकेट्स राखून पराभव करत सुपर फोरसाठी पात्र ठरले. दुसऱ्या फेरीत ते अपराजित राहिले आणि त्यांनी भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचा पराभव केला. फायनलच्या पहिल्या डावात नेमकं काय घडलं, पाहा...आशिया चषकाच्या अंतिम फेरीतील पहिल्या डावात श्रीलंकेचा भानुका राजपक्षा हा एकटाक पाकिस्तानला भिडल्याचे पाहायला मिळाले. भानुकाने यावेळी झुंजार अर्धशतक झळकावले आणि संघाला धावांचा डोंगर उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने तर यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि त्याच्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातल्याचे पाहायला मिळाले. रौफला पाकिस्तानच्या अन्य गोलंदाजांची चांगली साथ मिळाली. पण भानुकाने यावेळी धडाकेबाज फटकेबाजी करत श्रीलंकेचा एकाकी किल्ला लढवला आणि नाबाद ७१ धावांची खेळी साकारली. त्यामुळे श्रीलंकेला यावेळी पाकिस्तानपुढे १७१ धावांचे आव्हान ठेवता आले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0m1Cgok

No comments:

Post a Comment