Breaking

Friday, September 23, 2022

पोलीस लेकावर बडतर्फीची कारवाई, वडिलांचं धक्क्यानं निधन, कुटुंबीयांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव https://ift.tt/SCZTyMR

अकोला : शेगाव सराफा अत्याचार प्रकरणात दोषी आढळल्याने बडतर्फ झालेल्या पोलीस शिपाई यांच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव घेत निवदेन दिले. मुलगा पोलीस खात्यातून बडतर्फ झाल्याचं समजतात वडिलांना धसका बसला, त्यात त्यांचा मृत्यू झालाय, असा आरोप कुटुंबीयांनी केला असून हा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला आहे. शक्ती कांबळे यांच्या बडतर्फीच्या निर्णयाने त्याच्या वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा कुटूंबियांनी दावा केला आहे. अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरिक्षक चंद्रकिशोर मिनांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून आरोप करणाऱ्या सराफालाही वडिलांच्या मृत्यूला जबाबदार कांबळे कुटुबीयांनी धरले आहे. बन्सी कांबळे यांच्या मृत्यू बाबत कुटुंबीयांचे आरोप शक्ती कांबळे असं बड़तर्फ करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून बन्सी कांबळे असं त्यांच्या मृत वडिलांचं नाव आहे. दरम्यान, खोट्या चौकशीत ठेवलेल्या किरकोळ आरोपाखाली पोलीस खात्यातून बडतर्फ का करण्यात येऊ नये, ही नोटीस दिल्याने शक्तीच्या वडिलांना त्याचा धसका बसला. १७ सप्टेंबरला आयजींनी खोट्या आरोपात अडकवून बडतर्फ केले आहे, असा आरोप कांबळे यांच्या कुटुंबीयांनी केला. अमरावती परिक्षेत्र चंद्रकिशोर मीणा यांनीच १९ तारखेला घरी पोलीस पाठवले. या सूडबुद्धीने केलेल्या खोट्या तक्रारीत त्यांनी शक्ती कांबळे याला अडकवून त्याचं जीवन संपण्याचा प्रयत्न झालाय, असा आरोप कांबळे कुटुंबीयांनी केला. मुलावर झालेल्या कारवाईमुळं वडील बन्सी कांबळेंच्या मनावर दडपण आलं. त्यातून त्यांचा मृत्यू झाला. बन्सी कांबळे यांच्या मृत्यूला अमरावतीचे आयजी व वर्मा कुटुंबातील खोटे तक्रारदार जबाबदार असल्याचा दावा शक्ती कांबळे यांच्या कुटुंबीयांनी केला. संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे. कारवाई न झाल्यास अन्यथा अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयसमोर उरलेल्या मुलाबाळासह आत्मदहन करून माझ्या मुलाला अन्यायकारक कारवाईतून सुटण्यासाठी पाठबळ म्हणून आत्मदहन करु,असा इशाराही कांबळे कुटुंबीयांनी निवेदनातून दिला आहे. जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली. काय होतं नेमकं प्रकरण .... अकोला स्थानिक गुन्हे शाखेनं शेगावातील एका सराफा व्यावसायिकाला सोने चोरी प्रकरणात ९ जानेवारीला अटक केली. एपीआय नितीन चव्हाण आणि पोलिस शिपाई शक्ती कांबळे यांनी चोरीचे सोने खरेदी प्रकरणातील 'त्या' संशयित शेगावतील प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाला शेगावातून अटक केली. परंतु, सराफा व्यावसायकाची अटक, त्यानंतरची त्याची पोलीस कोठडी, पोलीस कोठडीतील त्याच्यासोबत झालेल्या अमानुषततेचा आरोप यामूळे स्थानिक गुन्हे शाखा फार अडचणीत सापडली होती. या प्रकरणी दोन चौकशी समित्या स्थापन करण्यात आल्या. यात बुलडाण्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या अहवालात गंभीर बाबी नमूद केल्या होत्या. या अहवालाच्या आधारावर या प्रकरणी एपीआय नितीन चव्हाणसह शिपाई शक्ती कांबळे, संदीप, काटकर, विरेंद्र लाड, गिता अवचार आणि आणखी एकाला निलंबित करण्यात आलं होतं. पुढे याच प्रकरणात एपीआय नितीन चव्हाण यांची पदावनती करण्यात आली. तर काही पोलीस शिपायांच्या बडतर्फीची प्रक्रिया केल्या गेल्या असून त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हेही दाखल झाले आहेत. पीडित सराफानं अकोला पोलिसांवर केलेले आरोप१) अटक केल्यानंतर शेगावतील घरी कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ. २) गाडीत अमानूष मारहाण आणि तोंडावर थुंकल्याचा आरोप. ३) मारल्याने पाय सुजल्यामूळे पायावर उकळतं पाणी टाकल्यानं पाय जळाल्याचा आरोप. ४) सोने चोरीतील इतर दोन आरोपींना अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करायला लावल्याचा एपीआय चव्हाण आणि कॉन्स्टेबल कांबळेवर आरोप. ५) कोर्टासमोर मारहाण झाल्याचं न सांगण्यासाठी दबाव. जबाबाच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्याचा आरोप


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1QOfC0o

No comments:

Post a Comment