दुबई : अफगाणिस्तानने भारताला अंतिम फेरीत स्थान मिळवून देण्यासाठी जीवापाड प्रयत्न केला. अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे १३० धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान माफक वाटत असले तरी त्यांनी अचूक आणि भेदक मारा केला. त्यामुळे पाकिस्तानना विजयासाठी अखेरच्या षटकात ११ धावा हव्या होत्या. पाकिस्तानच्या नसीम शाहने २०व्या षटकाच्या पहिल्या दोन्ही चेंडूवर षटकार खेचले आणि संघाला थरारक विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती, पण भेदक गोलंदाजी करत त्यांनी पाकिस्तानला चांगलेच वेठीस धरले होते. अफगाणिस्तानने पाकिस्तानपुढे विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून त्यांनी पाकिस्ताना जखडून ठेवायला सुरुवात केली. पहिल्याच षटकात पाकिस्तानला बाबर आझमच्या रुपात मोठा धक्का बसला. बाबरला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्यावेळी पाकिस्तानची १ बाद १ धाव अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर पाकिस्तानला एकामागून एक धक्के बसत गेले आणि त्यामुळे पाकिस्तानचा डाव अडचणीत आला. पाकिस्तानने आपला अर्धा संघ ९७ धावांमध्ये बाद झाला. त्यानंतर १३ धावांमध्ये पाकिस्तानने अजून तीन विकेट्स गमावले आणि त्यांची ८ बाद ११० अशी अवस्था झाली होती. त्यामुळे हा सामना आता कोण जिंकणार, याची उत्सुकता वाढली होती. कारण पाकिस्तानला जिंकण्यासाठी यावेळी २० धावांची गरज होती, तर दोन विकेट्स मिळवत अफगाणिस्तानचा संघ विजयी ठरू शकत होता आणि या परिस्थितीवर भारताच्या आशा अवलंबून होत्या. त्यानंतर १९व्या षटकात पाकिस्तानला दुसरा धक्का बसला आणि त्यांची ९ बाद ११८ अशी अवस्था झाली होती. पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकत अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. त्यानंतर अफगाणिस्तानच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आले नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पाकिस्तानला या सामन्यात जास्त धावांचा पाठलाग करावा लागणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानचा संघ कशी गोलंदाजी करतो, यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. कारण अफगाणिस्तानला पाकिस्ताविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १२९ धावाच करता आल्या होत्या. या सामन्यात अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. कारण ४३ धावांमध्येच त्यांना पहिले दोन फलंदाज गमवावे लागले होते. त्यानंतर अफगाणिस्तानचे एका मागून एक ठराविक फरकाने विकेट्स पडत गेले, पण अफगाणिस्तानच्या संघाने चांगली गोलंदाजी करत सामन्यात रंग भरले.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/l4Kg60P
No comments:
Post a Comment