लंडन : ब्रिटनच्या महाराणी एलिथाबेथ द्वितीय (Queen Elizabeth second) यांचे निधन झाले आहे. बकिंगहॅम पॅलेसने त्यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा केली आहे. तब्बल ७० वर्षे राज्य केल्यानंतर, ब्रिटनमधील सर्वात जास्त काळ महाराणी राहिलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी बालमोरल येथे निधन झाले. गुरुवारी त्यांची प्रकृती खालावली असल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. तेव्हापासून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. राणी काही दिवस स्कॉटलंडमधील बालमोरल वाड्यात होत्या. दर उन्हाळ्यात त्या तेथे जात असत. गेल्या काही दिवसांपासून राणींच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. शिवाय त्यांना फेब्रुवारीमध्ये त्यांना कोविड-१९ ची लागण देखील झाली होती. ( at the age of 96) प्रकृती अस्वास्थ्यामुळे राणी एलिझाबेथ यांची त्यांच्या प्रिव्ही कौन्सिलची बैठक रद्द करण्यात आली. त्यानंतर त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ट्रस या ९६ वर्षीय राणी एलिझाबेथ यांना भेटण्यासाठी स्कॉटलंडमधील अॅबर्डीनशायर येथील बालमोरल कॅसल या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. जगभरातील १५ देशांच्या सरकारांना दिली माहिती राणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर १५ देशांच्या सरकारांना माहिती देण्यात आली. कॅनडासह जगातील या १५ देशांवर राणीचे एकेकाळी राज्य होते. ३८ देशांच्या कॉमनवेल्थ देशांवरही राणीचे राज्य आहे. राणीने विन्स्टन चर्चिलपासून लिझ ट्रसपर्यंत अशा एकूण १५ ब्रिटिश पंतप्रधानांना शपथ दिली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/AjF3gJ0
No comments:
Post a Comment