तिरुवनंतपुरम : केरळमधील एका रिक्षा चालकाला लॉटरी लागल्याने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. या रिक्षा चालकाला १-२ कोटींची लॉटरी लागलेली नसून चांगली २५ कोटींची लॉटरी लागली आहे. आपल्याला लॉटरी लागली यावर रिक्षा चालकाचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा विश्वासच बसत नव्हता. या रिक्षा चालकाने रविवारी २५ कोटी रुपयांची ओणम बंपर लॉटरी जिंकली. असे या ऑटो रिक्षा चालकाचे नाव असून शेफ म्हणून काम करण्यासाठी मलेशियाला जाण्याच्या ते तयारीत होते. अनूप हे श्रीवरहम येथीस रहिवासी आहेत. अनूप यांनी लॉटरी जिंकण्याच्या एक दिवस आधी शनिवारी लॉटरीचे तिकीट (T-750605) खरेदी केले होते. गंमत म्हणजे त्यांचा तीन लाख रुपयांच्या कर्जासाठीचा अर्ज एक दिवस आधीच मंजूर झाला होता. (An auto driver in Kerala has won the Onam bumper lottery worth Rs 25 crore) अनूप यांनी तीन लाख रुपयांच्या कर्जासाठी एका एजन्सीला अर्ज केला होता. अनूप यांचा हा अर्ज एक दिवस आधीच मंजूर झाला होता. अनूपनी ज्या एजन्सीतून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते त्या एजन्सीमध्ये उपस्थित असलेल्या माध्यमांना सांगितले की 'T-750605' हे तिकीट त्याची पहिली पसंती नव्हतीच. त्यांनी घेतलेले पहिले तिकीट आवडले नाही म्हणून त्यांनी दुसरे तिकीट काढले आणि गंमत म्हणजे हेच तिकीट अनूपना लागले. अनूप यांचा मलेशिया प्रवास आणि त्याने कर्जासाठी केलेल्या अर्जाबाबत विचारले असता अनूप म्हणाले की, अर्ज प्राप्त झाल्यानंतर बँकेने अनूप यांना कॉल केला. मात्र मला आता कर्जाची गरज नाही, असे मी बँकेला सांगितले. आता मला मलेशियालाही जायचे नाही असेही मी बँकेला सांगितले. २२ वर्षांपासून काढत आहेत लॉटरीचे तिकीट अनूप हे गेल्या २२ वर्षांपासून लॉटरीची तिकिटे खरेदी करत आहेत. या दरम्यानच्या काळात अनूप यांना कमीतकमी काही शे रुपयांपासून ते कमाल पाच हजार रुपयांपर्यंत पैसे मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. अनूप माहिती देताना सांगितले की, मला हे लॉटरीचे तिकीट जिंकण्याची अपेक्षा नव्हती म्हणून मी टीव्हीवर लॉटरीचा निकाल पाहिलाच नाही. पण जेव्हा मी माझा फोन पाहिला तेव्हा मला समजले की मी जिंकलो आहे. माझा विश्वासच बसत नव्हता. लागलीच मी हा निकाल माझ्या पत्नीला दाखवला. माझी पत्नी मला म्हणाली की आपल्याला लॉटरी लागली आहे. कर्ज फेडून घर खरेदी करणार अनूप पुढे म्हणाले की, पत्नीने लॉटरी लागल्याचे सांगितले असले तरी मला अजूनही शंका होती. म्हणून मी लॉटरी विकणाऱ्या महिलेला तिकिटाचा फोटो पाठवला. त्यानंतर तिने खात्री करून सांगितले की याच क्रमांकाला लॉटरी लागली आहे. आता या पैशातून आपण आपले कर्ज फेडून स्वत:चे घर खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, जिंकलेल्या पैशातून अनूप यांना सर्व प्रकारची कर कपात होऊन १५ कोटी रुपये मिळणार आहेत. स्वतःचे हॉटेल खरेदी करण्याची ईच्छा अनूप यांनी सांगितले की, ते या पैशातून त्यांच्या नातेवाईकांना मदत करतील. तसेच काही धर्मादाय काम देखील करतील. तसेच केरळमधील हॉटेल क्षेत्रात त्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे. योगायोगाने, गेल्या वर्षीची ओणमची बंपर लॉटरीही एका ऑटो-रिक्षाचालकानेच जिंकली होती. कोचीजवळील मराडू येथील ऑटो-रिक्षा चालक जयपालन पीआर यांना त्यावेळी १२ कोटी रुपयांची लॉटरी लागली होती.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sIRG4Wm
No comments:
Post a Comment