पनवेल: अलीकडे कोकणात एसटी बसेसच्या अपघाताचे प्रमाण वाढल्याच दिसत आहे. रायगड जिल्हयात २२ ओक्टोबर रोजी शनिवारी दुपारी १२ च्या दरम्यान तालुका हद्दीत एक प्रवाशांनी भरलेली बस उलटल्याने आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. एसटी बस ड्रायव्हरही गंभीर जखमी झाला आहे. यावेळी तब्बल ४६ प्रवासी गाडीत होते. हा अपघात महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे चौकीजवळ झाला. (8 to 10 passengers have been injured in a ) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे - सांगली ही बस क्रमांक MH 40 N 9164 या बसला हा मोठा अपघात झाला. सुदैवाने बाकी सगळे प्रवासी सुखरूप आहेत. प्रवासी असलेली बस रस्त्याच्या बाजूला पलटली आणि एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी मदतिसाठी धाव घेतली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात कोन पुलावरून महामार्गावर जाणारा वळण घेत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व हा अपघात झाला. ही एसटी बस झाडांमध्ये उलटली. दिवाळीच्या सणासाठी चाकरमानी मुंबईहून गावी जाण्यासाठी या बसमधून प्रवास करीत होते. अपघातानंतर सर्व प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. महामार्ग पोलीस केंद्राला घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी तसेच त्यांच्या जवळ असलेल्या बॅगा आदी सामान बाहेर काढण्यात आले. या अपघातात ८ ते १० प्रवासी जखमी झाले आहेत तसेच बस चालकदेखील गंभीर जखमी आहे. त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी आयआरबीच्या रुग्णवाहिकेतून एमजीएम, कळंबोलीतील दवाखान्यात दाखल करण्यात आलंय. महामार्ग पोलीसांनी तात्काळ मदत करीत सर्व प्रवाश्यांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढले. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Z4s68Dv
No comments:
Post a Comment