पुणे: हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या एका २७ वर्षीय गॅरेज मालकाने स्वतःच्या गॅरेजमध्ये गळफास घेऊन केल्याचा प्रकार समोर आला आहे. एक वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते. अचानक झालेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अपष्ट आहे. आज ( शुक्रवारी) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. ( ends his life after a year of marriage) पवन उर्फ पांडुरंग शंकर कांबळे (वय २७, पूर्ण नाव माहिती नाही, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याचा मृतदेह खाली उतरवण्यात आला. शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा- याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे- सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत पवन कांबळे या २७ वर्षीय युवकाचे मातोश्री ऑटो नावाचे गॅरेज आहे. पवन कांबळे हा आज दुपारच्या सुमारास स्वतच्या गॅरेजमध्ये होता. बराच वेळ झाला त्याचा काही आवाज ना आल्याने शेजारच्या नागरिकांनी गॅरेज मध्ये डोकावून पाहिले तर पवन याने गळफास घेतल्याचे दिसून आले . नागरिकांनी याची माहिती त्वरित पोलिसांना कळवली. क्लिक करा आणि वाचा- पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवला. पुढील कारवाई साठी पाठवण्यात आला आहे. वर्षभरापूर्वीच पवन याचे लग्न झाले होते. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोणी काळभोर पोलीस पुढील तपास करीत आहेत. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/xTt3vCV
No comments:
Post a Comment