Breaking

Wednesday, November 2, 2022

Breaking : कथित लव्ह जिहाद जिहाद प्रकरणातील ती तरुणी तब्बल १७ दिवसांनी सापडली; कर्नाटकातून पोलिसांनी घेतले ताब्यात https://ift.tt/OMZYwUD

कोल्हापूर : १७ दिवसांपूर्वी कोल्हापुरातील एक बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. हे प्रकरण लव जिहादचे असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगितले जात होते. तर, या प्रकरणी आज सकाळी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर लव्ह जिहाद विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांतच लव जिहाद प्रकरणात पोलिसांना अखेर यश आले आहे. (the girl in the alleged love jihad jihad case was found after 17 days) बेपत्ता झालेली शाळकरी मुलगी मुस्लिम युवकासह कर्नाटकच्या संकेश्वरमध्ये सापडली आहेत. दोघांनाही कर्नाटक पोलिसांनी संकेश्वरमधून ताब्यात घेतलं असून कोल्हापूर पोलीस कर्नाटकात रवाना झाले आहेत. सकाळी झालेल्या आंदोलनानंतर कोल्हापूर पोलिसांनी मुलीचे अपरहण करणाऱ्या संशयिताचा फोटो प्रसिद्ध केला होता . त्यानंतर अपरहणकर्ता दिसल्यास ताबडतोब संपर्क करण्याचं आवाहन केले होते. यानंतर आता हे दोघे ही सापडले असून आज रात्री किंवा पहाटे पर्यंत दोघांना कोल्हापुरात आणणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. क्लिक करा आणि वाचा- कोल्हापुरात लव जिहाद सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात होती. कोल्हापुरातील नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना १७ ऑक्टोंबर रोजी घडली होती. तर याप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. क्लिक करा आणि वाचा- मुलीसोबत मुस्लिम युवकही गायब झाल्यामुळे हा लव जिहाद असल्याचा संशय मुलीच्या पालकांना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांना आला होता. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू होता मात्र सातारा दिवस उलटून ही अद्याप मुलगी सापडत नसल्याने पोलीस कारवाई करण्यात दिरंगाई करत असल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी केला होता. यामुळे आज कोल्हापुरात आमदार नितेश राणे आणि भाजपसह हिंदुत्ववादी संघटना कडून पोलीस स्टेशनच्या दारात मोठ आंदोलन ही झाले होते. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/dZ0Y4l6

No comments:

Post a Comment