अमरावती : अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्याबाबत धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याचं १० लाखांचं सोयाबीन रात्रीत मळणी करुन गायब करण्यात आलं आहे. चांदुरबाजार तालुक्यातील वडुरा येथील शेतकरी अशोकराव गुबरे यांची अज्ञात व्यक्तीने ९ एकरातील सोयाबीन काढून त्याची गंज लावली होती. मात्र, अज्ञात व्यक्तीनं मध्यरात्री सोयाबीन गायब केले आणि कुटाराला आग लावून दिली. अदांजे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले असून या सर्व घटनेचा पंचनामा चांदूरबाजार पोलीस स्टेशन करीत असून अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर दुसरीकडे मात्र गावात अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. या सर्व बाबी मुळे शेतकरी व गावातील नागरिक मोठ्या चिंतेत आहे. चांदुर बाजार तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा भाडेतत्त्वावर शेती करून आपला उदरनिर्वाह चालवणे हा मुख्य व्यवसाय आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात येथील शेतकरी भाडेतत्त्वावर शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्याचप्रमाणे तालुक्यातील वडुरा येथील शेतकरी अशोकराव गुबरे हे मौजे खराळा येथील ९ एकर शेती करतात. यावर्षी त्यांनी त्याशेतमध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती, पिकाला आपल्या मुला बाळापेक्षाही जपले कापणीला आल्यावर कापणी सुद्धा केली शेतामध्ये सायंकाळी गंजी लागून झाल्यावर उद्या काढू अशा आशेवर ते होते. दुसऱ्यादिवशी शेतामध्ये गेल्यावर पाहिलं असता सोयाबीनची गायब झाल्याचं त्यांनी पाहिलं. सोयाबीनची गंज काढून नेऊन कुटाराला आग लावून दिल्याची घटना समोर आली. ही घटना मध्यरात्री झाली असावी असा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी चांदुरबाजार पोलीस स्टेशनला धाव घेऊन तक्रार नोंदवली असून पुढील तपास सुरू असल्याचे चांदुर बाजार पोलीस स्टेशनचे पेंदोर यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/uULa98v
No comments:
Post a Comment