: हत्या प्रकरणातील दोषी , त्यांचे पती आणि इतर तिघांची तामिळनाडूतील तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून सुटल्यानंतर नलिनी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, सध्या आपण गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा विचार करत नाही आहोत. यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे आभार मानले. मी निर्दोष आहे या एकाच दृढ विश्वासाने मला इतकी वर्षे जिवंत ठेवले असेही त्या म्हणाल्या. (no plan to meet anyone of gandhi family says ) नलिनी श्रीहरन म्हणाल्या, 'मला माझ्या कुटुंबाला भेटायचे आहे. माझे कुटुंब, माझी मुलगी, माझ्या पतीचे कुटुंब सर्व माझी वाट पाहत आहेत. माझा नवरा जिथे जाईल तिथे मी पण त्याच्यासोबत जाईन. आम्ही ३२ वर्षे वेगळे होतो. आमचे कुटुंबीय आमची वाट पाहत आहेत. गांधी कुटुंबाबाबत नलिनी श्रीहरन म्हणाल्या, 'सध्या राहुल, प्रियंका किंवा गांधी कुटुंबातील कोणालाही भेटण्याचा माझा कोणताही विचार नाही.' 'सार्वजनिक जीवनात जाणार नाही' तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नलिनी म्हणाली की, हे माझ्यासाठी एक नवीन जीवन आहे आणि मी पुन्हा कधीही सार्वजनिक जीवनात सहभागी होणार नाही.' नलिनी गेल्या ३२ वर्षांपासून तुरुंगात होत्या. तामिळनाडूतील वेल्लोर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्या म्हणाल्या, 'माझ्या पती आणि मुलीसोबत आता हे नवीन आयुष्य आहे. मी सार्वजनिक जीवनात भाग घेणार नाही. मला ३० वर्षांहून अधिक काळ पाठिंबा दिल्याबद्दल मी तमीळ लोकांचे आभार मानू इच्छिते.' सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले? राजीव गांधी हत्याकांडातील आणखी एक दोषी एजी पेरारिवलनला सोडण्याचा दिलेला आदेश या दोषींनाही तितकाच लागू आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राजीव गांधी हत्येप्रकरणी सुमारे तीन दशकांपासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी श्रीहरन आणि अन्य पाच दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. २१ मे १९९१ रोजी झाली होती हत्या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९१९ रोजी तामिळनाडूमधील श्रीपेरुंबुद्दूर येथे निवडणूक रॅलीदरम्यान एका महिला आत्मघाती हल्लेखोराने हत्या केली होती. नलिनी यांच्याशिवाय त्यांचे पती व्ही. श्रीहरन उर्फ मुरुगन, आर.पी. रविचंद्रन, संथन, रॉबर्ट पायस आणि जयकुमार यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. श्रीहरन, संथन, रॉबर्ट आणि जयकुमार हे श्रीलंकेचे नागरिक आहेत, तर नलिनी आणि रविचंद्रन हे तामिळनाडूचे आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W5H7bug
No comments:
Post a Comment