Breaking

Saturday, November 5, 2022

२० रुग्णालयांत भूमिगत कचराकुंड्या; स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी पालिकेचा निर्णय https://ift.tt/FRHcEbT

मुंबई : मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची रिघ आणि त्याचा तिथल्या सेवांवर होणाऱ्या परिणामाबाबत नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. त्यात स्वच्छता, साठलेला कचरा असे मुद्दे पुढे येत असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांकडून तक्रारी केल्या जातात. मुंबई महापालिकेने पालिकेच्या रुग्णालयांमधील स्वच्छतेचा दर्जा उंचाविण्यासाठी भूमिगत कचराकुंड्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पालिकेच्या २० प्रमुख रुग्णालयात ही योजना राबविली जाणार आहे. त्यात केईएम, सायन, नायर, कूपरसारख्या मोठ्या रुग्णालयांचा समावेश आहे. मुंबई पालिकेने ४९ ठिकाणी भूमिगत कचराकुंड्या बसविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी ३१ ठिकाणी ही योजना प्रत्यक्षात राबविण्यास सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ पालिकेच्या अन्य प्रमुख रुग्णालयांतही भूमिगत कचराकुंड्या बसविल्या जाणार आहेत. त्या उपलब्ध झाल्यानंतर तिथे गोळा होणारा कचरा नंतर डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यात येणार आहे. सध्या कुलाबा येथे तीन ठिकाणी भूमिगत कचराकुंड्या पुरविण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर अन्य रुग्णालयांतही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. मुंबई पालिकेची चार वैद्यकीय महाविद्यालये, पाच विशेष रुग्णालये, एक दंतवैद्यकीय महाविद्यालय, १६ उपनगरीय रुग्णालये, २८ प्रसूतिगृहे, ७६ दवाखाने, १०० उपकेंद्रे आदी विस्तार आहे. सध्या मुंबईतील १६ ठिकाणी भूमिगत कचराकुंड्यांचा प्रत्यक्ष वापर सुरू आहे. त्यात कुलाब्यातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. मुंबईत विविध प्रभागांत १२ ठिकाणी ही सुविधा लवकरच दिली जाणार आहे. या योजनेचा विस्तार संपूर्ण प्रभागांमध्ये करण्याचाही पालिकेचा विचार आहे. त्याच धर्तीवर मुंबईतील रुग्णालयांना प्राधान्य दिले जात असून, त्याबाबत लवकरच सर्वेक्षण केले जाईल. रुग्णालयांमधील रुग्ण, नातेवाईकांची ये-जा लक्षात घेता स्वच्छतेचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो. रुग्णालयात ओला, सुका कचऱ्यासह वैद्यकीय कचराही तयार होत असतो. हा कचरा भूमिगत कचराकुंड्यांमध्ये गोळा करणे अधिक सोपे ठरणार आहे. त्यातून रुग्णालयांमध्ये स्वच्छता राखली जाईल व ठिकठिकाणी कचरा आढळणार नाही. - चंदा जाधव, पालिका उपायुक्त


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/c3Nsrzp

No comments:

Post a Comment