Breaking

Thursday, November 3, 2022

पाकिस्तानच्या अभिनेत्रीची झिम्बाब्वेला खुली ऑफर, म्हणाली 'भारताला हरवा आणि....' https://ift.tt/iLKYBc4

नवी दिल्ली : आता पाकिस्तानला विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी फक्त एकच पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे जर झिम्बाब्वेने भारताला पराभूत केले तरच पाकिस्तानचा संघ सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतो. पण यासाठी आता मैदानाबाहेरही जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे. आता तर पाकिस्तानच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीनेही यामध्ये उडी घेतली आहे. भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानच्या या अभिनेत्रीने झिम्बाब्वेला एक खुली ऑफरही दिली आहे. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. पण त्यानंतर त्यांनी आज जेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले तेव्हा त्यांच्याही आशा पल्लवित झाल्या. कारण आता ते विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात. मात्र, सेमी फायम पात्र ठरण्यासाठी झिम्बाब्वेला भारतावर विजयाची नोंद करावी लागणार आहे. यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारीनेही एक आकर्षक ऑफर दिली आहे. पाकिस्तानच्या अभिनेत्रीने कोणती ऑफर दिली आहे, पाहा...पाकिस्तानची अभिनेत्री सेहर शिनवारीने याबाबत एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये तिने झिम्बाब्वेला पुढच्या सामन्यात भारतीय संघाला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन, अशी ऑफर दिली आहे. तिने ट्विट केले की, "मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन. जर त्यांच्या संघाने भारताला पुढील सामन्यात पराभूत केले तर. यानंतर त्यांच्या ट्विटने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. हजारो लाईक्स मिळाले असून शेकडो लोकांनी रिट्विट केले आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना ६ नोव्हेंबरला आहेभारतीय संघाला शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे. हा सामनाही सुपर-१२ मधील शेवटचा असेल. हा सामना ६ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. म्हणजेच हा सामना होणार आहे जिथे भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचा रोमहर्षक सामना ४ विकेट्सने जिंकला होता. टी-२० विश्वचषकातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना होता. येथे झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचाही झिम्बाब्वेकडून पराभव झाला होता. भारताचा पराभव झाला तरी पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतील, पण...पाकिस्तानचा जेव्हा भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून पराभव झाला तेव्हा पाकिस्तानचे या विश्वचषकातील आव्हान संपले असे मानले जात होते, पण आज दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यावर त्याच्या आशा कायम राहिल्या. मात्र, गुणतालिकेत पाकिस्तान अजूनही ४ गुणांसह भारत आणि दक्षिण आफ्रिकेनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेने भारताला हरवले तरी पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात बांगलादेशला हरवले तरच ते उपांत्य फेरीत पोहोचतील.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/PWSzcDm

No comments:

Post a Comment