Breaking

Monday, November 7, 2022

जितेंद्र आव्हाड हर हर महादेव चित्रपटाविरोधात आक्रमक, ठाण्यातील शो बंद पाडला, मनसेकडून सुरु https://ift.tt/PHw2GzN

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पडला. चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. आमची इच्छा काय आहे हे त्यांना कळलं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर घेतल्याचं दाखवलंय ते तसं नाही, शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासंदर्भात जे दाखवलं ते इतिहासाला धरुन नाही. अक्षय कुमारला आमचा विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया १६ ते ४६ वयाच्या दरम्यानच्या होत्या. अक्षय कुमारचं सध्याचं वय काय आहे, तो दाखवू शकणार आहे का? शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात विकृती का दाखवली जात आहे. शिवाजी महाराजांचा आदर बाजीप्रभू देशपांडे करायचे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यासह कार्यकर्त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना चित्रपटगृहातून बाहेर काढलं. अमेय खोपकर जे काय बोलत आहे त्यांना बोलू द्या त्यांना उत्तर देणार नाही. आम्हाला यायला उशीर झाला ही आमची चुकी झाली. आम्ही चित्रपटाचा शो सुरु होण्यापूर्वी आम्ही यासंदर्भात आवाहन करणार होतो, पण पालघरचे लोक आल्यानं आम्हाला उशीर झाला. चित्रपट सृष्टीनं काय घडू शकतं हे या देशानं बघितलेलं आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि शिवाजी महाराजांशी लढाई झाली हे दाखवलं जातंय हे तुम्हाला पटतंय का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मांडीवर झोपवला हे तुम्हाला पटत का? शिवाजी महाराजांविरोधात बाजीप्रभू देशपांडे यांना लढायचंय हे दाखवलं जातं हे तुम्हाला पटतं का? शिवाजी महाराज आणि बाजी प्रभू देशपांडे यांची लढाई याला संदर्भ आहे का? तुम्ही उद्या काहीही दाखवाल, हे महाराष्ट्राला पटतंय का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांनी चित्रपटगृहात जाऊन शो पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरे मराठी सिनेमाच्या पाठिशी आहेत, असं अविनाश जाधव म्हणाले. विरोध करण्याचे मार्ग वेगळे आहेत, असं अविनाश जाधव म्हणाले. काही वेळानंतर चित्रपटाचा शो पुन्हा सुरु झाला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/0chHjCe

No comments:

Post a Comment