मुंबई : राज्य परिवहन (एसटी) कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून वैद्यकीय खर्चासाठी देण्यात येणारी रक्कम म्हणजे चेष्टा ठरत आहे. वैद्यकीय खर्चाचे आकडे गगनाला भिडत असताना महामंडळ अद्यापही १९९७च्या काळातच आहे. त्यामुळे १९९७च्या दरपत्रकाआधारे हाती येणारी रक्कम ही एकूण वैद्यकीय खर्चाच्या १० ते १५ टक्केच असते. गेल्या २५ वर्षांपासून कर्मचारी हे नुकसान सोसत आहेत. एसटी महामंडळामध्ये सध्या जवळपास ९० हजार कर्मचारी काम करत आहेत. यापैकी सुमारे चालक ३८ हजार, वाहक ३४ हजार आणि यांत्रिक १६ हजार आहेत. या कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते कमी असल्याने आधीच त्यांना आर्थिक चिंतेचा सामना करावा लागतो. एखादा दुर्धर आजार बळावल्यास कर्ज काढून बिल चुकते करावे लागते. यामुळे गावखेड्यातील सावकारी चक्रव्युहात एसटी कर्मचारी अक्षरक्ष: पिळून निघतो आणि कर्जबाजारी होतो. पोलिसांच्या धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांना ‘आरोग्यकार्ड’ देण्याचा प्रस्ताव महामंडळात धूळ खात आहे. प्रत्येकवेळी विरोधी राजकीय पक्षाच्या कामगार संघटनेने याबाबत निवेदने दिली. मात्र सरकारमध्ये आल्यावर त्यांना याचा विसर पडला. १९९७च्या दरपत्रकानुसार कर्मचाऱ्यांचा वार्षिक वैद्यकीय खर्च हा ३५ ते ४० कोटी होतो. आरोग्यकार्ड काढल्यावर हा खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामंडळ तोट्यात असल्याचे कारण देत गेली २५ वर्षे हा प्रश्न तसाच ठेवण्यात आल्याचे एसटीतील सूत्रांचे म्हणणे आहे. सरकार, प्रशासन बेफिकीर गेल्या २५ वर्षांत राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी सत्तेचा उपभोग घेतला. मात्र प्रत्यक्षात एकाही मुख्यमंत्र्यांनी, परिवहनमंत्री किंवा एसटी महामंडळाच्या अध्यक्षांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. यामुळे त्याला कारण ‘प्रशासनाची अकार्यक्षमता’ की ‘सरकारचे दुर्लक्ष’ असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आज बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाची आज, शुक्रवारी बैठक होत आहे. मे महिन्यात शेवटची संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. यामुळे शिंदे काय निर्णय घेणार, याकडे एसटी कर्मचाऱ्यांचे लक्ष आहे. वैद्यकीय बिलांचे दर (रुपयांमध्ये)चाचणी/तपासणी एसटीकडून लागू असलेले दर बाजारदर एक्स रे (१४”×१७”) ९५ ३५० सोनोग्राफी ५०० १०००/३००० कार्डियाक अँजिओग्राफी २०० १५,००० ब्लड शुगर ५० १०० ईसीजी ७५ ३५० हिमोग्लोबिन १० २००/२५० प्लाझ्मा, हिमोग्लोबिन ४० १०० युरिन रुटीन एक्झामिनेशन २५ १३०/१५० २ डी इको ५०० २००० सीटी स्कॅन हेड १००० २००० (………स्रोत - कर्मचारी विभाग परिपत्रक, एसटी महामंडळ) सध्याचे वैद्यकीय सल्ला शुल्क सध्या बाजारात एमबीबीएस डॉक्टर साधारण ५०० रुपये शुल्क आकारतात. वरिष्ठ डॉक्टर १००० रुपये तर विशेषज्ञ १५०० रुपये आकारत आहेत. एसटी महामंडळ मुंबईमध्ये एमडी डॉक्टरांसाठी किमान १०० ते कमाल ३०० रुपये देते. राज्यभर नाममात्र रक्कम मुंबई, नगर-पुणे-नागपूर, नाशिक-अमरावतीसह अन्य जिल्हे आणि तालुका अशा चार विभागांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. या विभागांसाठी महामंडळाचे स्वतंत्र दर आहेत. वैद्यकीय क्षेत्रात पाच वर्षांचा अनुभव असलेल्या एमडी डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी तालुका स्तरावर ३० रुपये, नाशिक-अमरावतीसह अन्य जिल्ह्यांसाठी ५०, अहमदनगर-पुणे-नागपूरसाठी ७५ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Q9Npo6k
No comments:
Post a Comment