Breaking

Saturday, November 12, 2022

लव्ह जिहाद मुद्द्यावरून आमदार नितेश राणे भडकले, अबू आझमींना दिले हे उत्तर https://ift.tt/VqYdHE9

सिंधुदुर्ग : वरून राज्यात सध्या वातावरण तापलेले असताना समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपा यांनी त्यांना उत्तर दिले आहे. याबाबतचा एक व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. (nitesh rane gives reply to sp leader on ) अबू आझमी यांना उत्तर देताना आमदार नितेश राणे म्हणाले की, अबू आझमी यांनी काल एक वक्तव्य केले आहे. मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलीशी लग्न केले की त्याला लव्ह जिहाद म्हणतात. मग एका मुस्लिम तरुणीने हिंदू मुलाबरोबर लग्न केलं तर त्याला लव्ह जिहाद म्हणणार का? मी अबू आझमी यांना एवढे स्पष्ट करतो की हिंदू समाज कधीही धर्मांतरासंदर्भात कुणावरही जोर जबरदस्ती करत नाही. कोणाची फसवणूक करत नाही. क्लिक करा आणि वाचा- ते पुढे म्हणाले की, असे एक तरी उदाहरण अबू आझमी यांनी मला दाखवावे, जिथे एका मुस्लिम तरुणीशी लग्न केल्यानंतर हिंदु तरुणाने तिला धर्मांतर करण्याविषयी जबरदस्ती केलेली आहे. प्रवृत्त केलेल आहे, फसवलेले आहे, असे एक तरी उदाहरण अबू आझमी यांनी मला दाखवावे. क्लिक करा आणि वाचा- भाजपा आमदार नितेश राणे पुढे म्हणाले की, म्हणून लव्ह जिहाद का म्हणतात ? कारण जिथे जिथे हिंदू मुलींची फसवणूक होते, जिथे जिथे हिंदू मुलींना खोटं बोलून त्यांच्याशी लग्न करून त्यांना चुकीच्या मार्गावर नेलं जातं, त्याला लव्ह जिहाद म्हणतात. हे अबू आजमी यांनी नीट पद्धतीने लक्षात घ्यावे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/U1RePY7

No comments:

Post a Comment