Breaking

Wednesday, November 9, 2022

T20 World Cup : सेमी फायनलपूर्वी इंग्लंडची चिंता वाढली; कॅप्टनने दिले मोठे अपडेट https://ift.tt/Jwe7f9l

अ‍ॅडलेड: T20 विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत इंग्लंडची टक्कर भारताशी () होणार आहे. हा सामना अ‍ॅडलेड ओव्हलवर होणार आहे. पहिला उपांत्य सामना जिंकून पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. आता पाकचा मुकाबला १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल. संघाचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मलान दुखापतग्रस्त असताना आता उपांत्य फेरीपूर्वी इंग्लंड संघासाठी आणखी एक वाईट बातमी येत आहे. (mark wood is set to miss the semi final against india) कोपराच्या दुखापतीनंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर मार्क वुड इंग्लंडसाठी सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्याने सातत्याने १४५ किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे. यादरम्यान त्याने ७.७१ च्या इकॉनॉमी रेटने नऊ विकेट्स घेतल्या आहेत. पण इंग्लंडच्या अ‍ॅडलेड ओव्हलवर झालेल्या दोन सराव सत्रात त्याने गोलंदाजी केली नाही. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार तो भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता नाही. त्याच्या स्नायूंमध्ये घट्टपणा आला असल्याचे सांगितले जात आहे. वाचा- ख्रिस जॉर्डन खेळणार मार्क वुडच्या दुखापतीच्या कारणामुळे ख्रिस जॉर्डनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची तयारी सुरू आहे. बोटाला झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर जॉर्डनने फक्त एकच सामना खेळला आहे. त्याने गेल्या महिन्यात कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन षटकांत ३९ धावा दिल्या. पण तो एक अत्यंत अनुभवी टी-२० गोलंदाज आहे. तो फलंदाजीतही मोठे फटके मारू शकतो. वाचा- श्रीलंकेविरुद्ध मलानला दुखापत झाली होती या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज डेव्हिड मलानच्याही खेळण्याबाबत साशंकता आहे. शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मलानला दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षणादरम्यान जखमी झालेला मालन फलंदाजीलाही आला नाही. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या जागी फिल सॉल्टला खेळण्याची संधी मिळू शकते. वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/4rZJwFh

No comments:

Post a Comment