Breaking

Monday, December 19, 2022

रोहित शर्माच्या दुखापतीबाबत आले मोठे अपडेट; सक्तीने या खेळाडूला करावे लागले... https://ift.tt/7DRUniM

मुंबई: भारताचा कर्णधार सध्या सुरू असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील आगामी दुसऱ्या सामन्यालादेखील मुकण्याची शक्यता आहे. बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यानच रोहितला दुखापत झाली होती. सध्या त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे वृत्त ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ वेबसाइटने दिले आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत स्लिपला फलंदाजी करताना रोहितच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. किमान दुसऱ्या कसोटीपूर्वी तरी दुखापतीतून सावरता येईल, या उद्देषाने रोहित मायदेशी परतला आहे. दुखापतीचे वैद्यकीय परिक्षणही झाले. यात त्याचा अंगठा निखळल्याचे स्पष्ट झाले असून जखमेवर काही टाकेही घालण्यात आल्याचे संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे. या दुखापतीतून सावरण्याकडे रोहितची वाटचाल व्यवस्थित सुरूदेखील आहे; पण भारतीय संघात पुढील काही महिन्यांत बरेच क्रिकेट खेळणार आहे. त्यामुळे रोहितबाबत जोखीम पत्करण्यास संघव्यवस्थापन तयार नाही. पुढील आठवड्यात रोहितच्या दुखापतीचे पुन्हा निरीक्षण होईल. तो यातून किती सावरला आहे, हेदेखील बघितले जाणार आहे. वाचा- येत्या जानेवारीत भारतीय संघ न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध मायदेशातच सहा वनडे आणि सहा टी-२० लढतींमध्ये भाग घेणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटींच्या मालिकेस भारतात सुरुवात होईल. या मालिकेतील सलामीची कसोटी ९ फेब्रुवारीपासून होईल. अर्थात सध्या भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीची घोषणा केलेली नाही. या निवड समितीसाठी सोमवारी तरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या नाही, असेही संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल भारताच्या बदली कर्णधाराच्या भूमिकेत असेल, तर चेतेश्वर पुजारा उपकर्णधारपद भूषवित आहे. वाचा- दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ सोमवारी ढाक्यात दाखल झाला आहे. मंगळवार, बुधवारी भारताच्या सराव सत्रांचे आयोजन होईल. मालिकेतील दुसऱ्या कसोटीचे आयोजन शेर ए बांगला स्टेडियमवर होते आहे. ‘भारतीयांमुळे मुस्तफिझूरला गवसली लय’ चितगाव : बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानला सूर, लय गवसली ती श्रीधरन श्रीराम आणि श्रीनिवास चंद्रशेखरन या दोन भारतीयांमुळे, असे या संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक अॅलन डॉनल्ड यांनी सांगितले. कसोटी मालिकेआधी पार पडलेल्या वनडे मालिकेत बांगलादेशने भारतावर मात केली. या जेतेपदात मुस्तफिझूरच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा वाटा होता. श्रीराम हे बांगलादेशच्या टी-२० संघाचे प्रशिक्षकपद भूषवत असून श्रीनिवासन कामगिरी विश्लेषकाच्या भूमिकेत आहेत. या दोघांनी मुस्तफिझूरच्या अडचणींवर तोडगा काढला. त्याच्या चुका हेरून त्या दुरूस्त करून घेतल्या. वाचा- ... षटकांत एखादा संथ चेंडू टाकताना मुस्तफिझूरच्या हाताचा पंजा पूर्ण खुला होऊन फलंदाजांना सहज दिसत होता. श्रीराम आणि श्रीनिवास यांनी हा पंजा फलंदाजांना दिसणार नाही, याची खबरदारी घेत थोडा बदल केला, ज्याचा फायदा होत असल्याचे डॉनल्ड यांनी सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lo9Lv2q

No comments:

Post a Comment