Breaking

Thursday, December 15, 2022

समृद्धी महामार्गावर हे चाललंय काय?; आज तिसरा अपघात... पती, पत्नी व ११ महिन्यांचे बाळ जखमी https://ift.tt/DK3EXlo

बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिमाखात लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर आज पुन्हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. शिर्डीहून अमरावतीकडे परतणाऱ्या एका कारचा समृद्धी महामार्गावरील विझोरा शिवारात अपघात झाला. या अपघातात पती, पत्नी आणि मुलगा जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. आज गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्यांची नावे सुमित गावंडे, प्रियंका गावंडे आणि ११ महिन्याचा मुलगा वेद अशी आहेत. सुमित गावंडे हे आपली पत्नी प्रियंका व ११ महिन्यांचा मुलगा वेद हे शिर्डीहून कारद्वारे (क्र. एमएच-२७-डीए-४१०४) अमरावतीकडे परत येत होते. विझोरा शिवारात गावंडे यांचा गाडीवरील ताबा सुटला व त्यांची कार समृद्धीच्या चॅनल नंबर ३२६.९ व जाऊन आदळली. क्लिक करा आणि वाचा- एअरबॅगमुळे टळली जीवितहानी सुदैवाने कारमधील एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली. मात्र, कारमधील तिघांना दुखापत झाली आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गावरील रूग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या होत्या. दुखापत गंभीर नसल्याने गावंडे यांनी आपल्या नजीकच्या नातेवाइकांना बोलावून घेऊन त्यांचे सोबत ते मेहकरकडे गेले. अपघातग्रस्त कार घटनास्थळी असून महामार्ग पोलिस निरीक्षक शैलेश पवार, गणेश सुसर, विठ्ठल काळूसे, शेख रोशन, गणेश उबाळे, संदीप शिर्के यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य केले. क्लिक करा आणि वाचा- महत्त्वाचे- > समृद्धी महामार्गाचे ११ डिसेंबर रोजी झाले लोकार्पण. > चार दिवसात जिल्ह्यातील अपघाताची आजची तिसरी घटना. > अपघातला रस्ते जबाबदार की वेग याचा तपास करणे महत्त्वाचे. > अपघातांना आळा बसावा या करता लवकर कडक उपायोजना करणे गरजेचे. > एखादी मोठी दुर्घटना होण्याआधी महामार्गाच्या वेगाबाबत पुर्विचार करणे गरजेचे. > महामार्गावर सूचनाफलक वाढवणे गरजेचे. > वाहन चालकांनी सुसाट वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/k9Pn3sb

No comments:

Post a Comment