Breaking

Monday, December 12, 2022

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघात मैदानात उतरणार, उद्यापासून पहिला रणजी सामना https://ift.tt/fQOKnzW

मुंबई : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली आता मुंबईचा संघ आता रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत उतरणार आहे. मंगळवापासून रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मुंबईचा हा पहिलाच सामना असणार आहे. मुंबईसाठी हा मोसम सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण गेल्या मोसमात मुंबईचा संघ हा अंतिम फेरीत पोहोचला होता. त्यामुळे यावेळी अजिंक्यच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. गतवर्षीच्या उपविजेत्या मुंबईची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील विजेतेपदांचा दुष्काळ संपवण्याची मोहिम आज, मंगळवारपासून सुरू होईल. आंध्र प्रदेशविरुद्ध विझियानग्राम येथे होणाऱ्या या लढतीवर पावसाचे सावट आहे. मुंबईच्या प्राथमिक साखळीत एकूण आठ लढती आहेत. त्यानंतर अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत. मंडोस या चक्रीवादळाचा परिणाम अद्याप कायम आहे. त्यामुळे आजपासून, तीन दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यातील मंगळवारी पहिल्या दिवशी पावसाची शक्यता ५० टक्के आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल, असा कयास आहे. अजिंक्य रहाणे कर्णधार असलेल्या संघासमोर केवळ पावसाचेच आव्हान नाही. विझियानग्राम येथील पी. व्ही. जी. राजू एसीए क्रीडा संकुलात ही लढत होणार आहे. मुंबई संघाच्या मुक्कामाचे ठिकाण स्टेडियमपासून सुमारे दीड तास दूर आहे. त्यामुळे रोज सकाळी तसेच संध्याकाळी प्रवास करण्याचे आव्हानही संघासमोर असेल. हे मैदान चांगले आहे. पूर्ण आच्छादित आहे, त्यामुळे गेले दोन दिवस झालेल्या पावसाचा परिणाम खेळपट्टीवर झाला नसेल, अशी अपेक्षा आहे. सर्फराज, यशस्वी दाखलयशस्वी जयस्वाल आणि सर्फराज खान यांच्या संघातील पुनरागमनामुळे मुंबईची ताकद वाढवली. बांगलादेशातील भारतीय अ संघाबरोबरची मालिका खेळून हे दोघे मायदेशी परतले आहेत. ते तातडीने मुंबई संघात दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबईची फलंदाजीची ताकद वाढली आहे. सर्फराजने गत दौन मोसमात दोन हजाराहून जास्त धावा केल्या आहेत, तर यशस्वीने बांगलादेशात भारताच्या अ संघातून खेळताना शतक केले होते.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/hzMar46

No comments:

Post a Comment