Breaking

Tuesday, December 20, 2022

चार दिवस सासूचे...; सुनेकडून सासू पराभूत, माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या पॅनलला धक्का https://ift.tt/gNatCGL

धुळे : 'चार दिवस सासूचे, चार दिवस सूनेचे, अशी एक म्हण प्रचलित आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात या म्हणीचा प्रत्यय आला आहे. चीमठणे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंचपदाचा बहुमान मिळविण्यासाठी चिमठाण्यात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. या निवडणुकीत सून असलेली छोटीबाई दरबारसिंग गिरासे आणि चूलत सासू कल्पना सुभाष गिरासे यांच्यात सामना रंगला होता. आतापर्यंत प्रत्यक्षात आपण सासू सुनेची भांडणे घरापर्यंत मर्यादित असल्याची बघितली आहेत. परंतु, या पलीकडेही जाऊन शिंदखेडा तालुक्यातील एका सासू सुनेचे भांडण चक्क ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात पोहोचले होते. सासू एका पॅनलकडून तर सून दुसऱ्या पॅनलकडून परस्पर विरोधी उभे ठाकल्याने चीमठाणे गावातील मतदार चांगले संभ्रमात पडले होते. या दोघी सासू सुनेचा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला होता. मात्र सुनेला सासू वरचढ भरल्या आहेत. तब्बल ७८५ मते घेऊन सत्ता सासूबाईंच्या हातून गेली आहे. क्लिक करा आणि वाचा- शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे गाव हे राजकारणात धुळे जिल्ह्यातील प्रमुख तसेच प्रसिध्द असून गेल्या अनेक वर्षांपासून शिंदखेडा तालुक्यामध्ये चिमठाणे ग्रामपंचायतीत भाजपचे आमदार जयकुमार रावल यांची एक हाती सत्ता होती. परंतु, ह्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला असून तसेच चिमठाणे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्यांना देखील यांचा मोठा धक्का बसला असून ग्रामविकास पॅनलचा विजय झाला आहे. क्लिक करा आणि वाचा- शिंदखेडा तालुक्यातील चीमठाने गावात सरपंचपदाकरीता अत्यंत चुरशीच्या आणि रंजक बनलेल्या निवडणुकीत छोटीबाई गिरासे यांनी सासू कल्पना गिरासेंचा ७८५ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत अखेर सुनेची सरशी झाली. छोटीबाई गिरासे ह्या माजी पंचायत समिती अध्यक्ष दरबारसिंग गिरसे यांच्या धर्मपत्नी आहेत. ह्या विजयाने शिंदखेडा तालुक्यातील विद्यमान आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावल यांना देखील चिमठाणे गावातील या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाचे चित्र पाहायला मिळाले आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ZeFlJiv

No comments:

Post a Comment