Breaking

Thursday, December 15, 2022

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयासाठी कायपण.. संपूर्ण पॅनेलवर भानामतीचा प्रकार ! सांगलीत खळबळ https://ift.tt/HWX2rsp

सांगली: ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा रंग भरलेला असताना,आता या निवडणुकीत करणी भानामतीने विरोधाकांच्या विजयात भंग घालण्याचा प्रकार होत असल्याचं समोर येत आहे.खानापूर तालुक्यातील जाधव नगर ग्रामपंचायतच्या एका पॅनलचा थेट पराभव करण्यासाठी करणी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे,तर वाळवा तालुक्यातल्या कणेगाव,या ठिकाणीही भानामतीचा प्रकार समोर आला असून,या प्रकाराने निवडणुकीतील प्रचारापेक्षा या भानामतीच्या प्रकाराची चर्चा अधिक रंगली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ४४७ ग्रामपंचायत आणि सरपंच पदांच्या निवडणुका पार पडतात गावागावांमध्ये यांनी निवडणुकीचे टशन पाहायला मिळतंय स्थानिक पातळीवर लढवल्या जाणाऱ्या या निवडणुकीत आपलाच विजय व्हावा यासाठी सर्वच उमेदवार व पॅनल मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी विरोधक हे या निवडणुकीमध्ये विजयासाठी अनेक हातखंडे देखील वापरताना पाहायला मिळतंय मग मतदारांच्या दारात असेल तुमच्या शेतात असतील किंवा कामावर जाऊन मतदार राजांना भुरळ घालत आहेत. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील जाधव नगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनलच्या पराभवासाठी एक वेगळाच हातखंडा वापरण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे,तो म्हणजे अख्या पॅनलवर करणी भानामती केल्याचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. गावातील हनुमान विकास पॅनलच्या बॅनर समोर हळदी कुंकू आणि लिंबू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.गावाच्या वेशीवर हनुमान विकास पॅनलच्यावतीने सर्व उमेदवारांचे फोटो व निवडणूक चिन्ह असलेले एक भले मोठे डिजिटल बॅनर रस्त्याच्या कडेला लावण्यात आले असून या बँनरच्या समोर दगड ठेवून त्याला हळद-कुंकू लावून दोन लिंबू ठेवण्यात आले आहेत,हा प्रकार समोर आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. तर दुसऱ्या बाजूला वाळवा तालुक्यातल्या कणेगाव या ठिकाणी देखील भानामतीचा प्रकार समोर आला आहे,गावाच्या वेशीवर एक भली मोठी बुट्टी आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.ज्यामध्ये लिंबू, काळी बाहुली,नारळ, हिरवं कापड आणि त्यांना हळद-कुंकू लावून रस्त्याच्या कडेला ही बुट्टी ठेवण्यात आली आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा भानामतीचा प्रकार झाल्याची गावात सध्या चर्चा सुरू आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Hs10fRT

No comments:

Post a Comment