Breaking

Thursday, December 22, 2022

तेरणेचा ताबा डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथकडे?; कर्ज वसुली न्यायाधिकरणाने '२१ शुगर'ची याचिका फेटाळली https://ift.tt/HxQkVUA

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हयातील ढोकी येथील तेरणा सहकारी साखर कारखाना ज्यांच्या ताब्यात त्यांची उस्मानाबाद जिल्हयावर सत्ता असे समीकरण प्रसिद्ध आहे. ढोकी येथील याच तेरणा कारखाना हस्तांतरचा निकाल लागला असून लातूर येथील २१ शुगर समूहाची याचिका DRAT( कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई ) कोर्टाने फेटाळली. त्यामुळे तेरणा आता . यांच्या भैरवनाथ साखर उदयोग समुहाकडे पुढील २५ वर्षे असणार आहे. पण लातूरच्या २१ शुगर उदयोग समूहाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली, तर निकाल लागेपर्यंत डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर उदयोगाला थांबावे लागणार आहे. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ३२५ कोटी रुपयांच्या थकित कर्जासाठी हा २५ वर्षे भाडेतत्वार देण्यासाठी २४ नोव्हेंबर रोजी प्रक्रिया राबवण्यात आली होती. यासाठी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या भैरवनाथ साखर उदयोग समुहाने अनामत रक्कम जमा करून बोली लावली होती. ६ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत तेरणा कारखाना, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भैरवनाथ साखर उदयोग यांचे ट्राय पार्टी अँग्रीमेंट झाले होते. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या २१ शुगर उदयोग समुहाची निविदा वेळेत दाखल झाली नसल्याचे कारण देत ही निविदा फेटाळली होती. या बाबत माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या २१ शुगर उदयोग समुह यांनी निविदा प्रक्रियेवर संशय घेत सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली. तेथे अर्ज फेटाळल्या नंतर DRT ( कर्ज वसुली न्यायाधिकरण औरंगाबाद ) येथे दाद मागितली होती. तेथे भैरवनाथचा अर्ज मंजूर झाला, तर २१ शुगरचा अर्ज फेटाळला. त्यानंतर DRT कोर्ट विरोधात पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे दाद मागितली. तेथे ही भैरवनाथ साखर समूहाचा अर्ज मंजूर झाला आणि २१ शुगर समुहाचा अर्ज फेटाळला. पुन्हा या निर्णयाबाबत DRT कोर्ट औरंगाबाद येथे अर्ज केला होता. DRT कोर्ट औरंगाबाद येथे भैरवनाथ साखर समुहाचा अर्ज मंजूर झाला, तर २१ शुगर समुहाचा अर्ज फेटाळला. या निर्णया विरोधात DRAT ( कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई ) कोर्टात दाद मागिण्यात आली होती. क्लिक करा आणि वाचा- वर्षभरात ५ वेळेस २१ शुगर समूह कोर्टात गेले होते. हा न्यायालयीन वाद गेली वर्षभर सुरु होता. या निकालामुळे आता तेरणेचा मार्ग आता सुकर झाला आहे. तेरणा सहकारी साखर कारखान्यावर भविष्य निर्वाह निधी, जीएसटी वस्तु सेवा कर, महावितरण, राज्य उत्पादन शुल्क यांची थकबाकी आहे. तेरणा सहकारी साखर कारखाण्याचे ३५ हजार सभासद असून किमान १२० गावात सभासद आहेत. या कारखान्यात १५०० हजार कर्मचारी असून त्यांना आता रोजगार उपलब्ध होणार आहे. तेरणा कारखाना सुरू झाला तर ग्रामीण भागातील अर्थकारणाला चालना मिळणार आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांचे तेरणा साखर कारखाण्यावर वर्चस्व होते. तसेच, उध्दव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडेसुध्दा तेरणा कारखाना होता. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/LgvUSkV

No comments:

Post a Comment