Breaking

Sunday, December 11, 2022

ताई, तुम्ही बाईमाणूस आहात; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा सुषमा अंधारेंना अजब सल्ला https://ift.tt/idHCR9x

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी शिवसेनेच्या उपनेत्या यांनी मनसे आणि राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मात्र हे प्रत्युत्तर देत असताना नांदगावकर यांनी अंधारे यांना एक अजब सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, त्या ताईंना माझी विनंती आहे की, तुम्ही बाईमाणूस आहात, बाईने बाईसारखे बोलावे, माणसासारखे बोलू नये. मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाण्यात कोकणवासींयाशी संवाद साधण्यासाठी आले होते. शिवसेनेच्या उपनेत्या यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडल्याच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया काय आहे, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, बाईमाणसाने बाईसारखेच बोलले पाहिजे, माणसासारखे बोलू नये. आम्हीही माझगावचे आहोत. माझगावचे त्यांचे पूर्वीचे नेते यांच्याकडून कशी एक्टिंग करायची हे आम्ही देखील शिकलो आहे. तुमच्यापेक्षा आम्ही जास्त ॲक्टिंग करू शकतो. त्यामुळे कोणावर टीका करायची याचा विचार केला पाहिजे. आम्ही कधी त्यांच्या वरिष्ठांवर टीका केली नाही. इतर कोणी केली असेल, पण बाळा नांदगावकरने कधी टीका केली नाही. कारण आम्हाला भान आहे, कोणावर टीका करावी, कोणावर करू नये. राज्यपालांच्या वक्तव्यावर केले भाष्य बाळा नांदगावकर यांनी राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर देखील भाष्य केले आहे. संविधानिकपदावर बसणाऱ्या माणसांनी भान ठेवून भाष्य केले पाहिजे. मग ते मंत्री असोत, राज्यपाल असोत किंवा बाळा नांदगावकर असो. आपण काय वक्तव्य करायचे हे ठरवून बोललं पाहिजे. कारण छत्रपती हे आमची अस्मिता आहे. त्याबाबत आम्ही कुठलीही तडजोड स्वीकारणार नाही, असे बाळा नांदगावकर म्हणाले. मुंबई ते गोवा महामार्ग हा निश्चितपणे झालाच पाहिजे. मुंबई येथील कोकणवासी मुंबई-गोवा महामार्गाबाबत आपेक्षा ठेऊन आहेत. आमच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या मागणीनंतर समृद्धी महामार्ग तयार झाला, परंतु मुंबई-गोवा महामार्ग अद्याप झाला नाही हे आमचं दुर्दैव आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकदा तो रस्ता बनवून गाडी चालवत जावे, याने आम्हाला आनंद वाटेल, अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांचा कोकण दौरा अत्यंत यशस्वी झाला. परंतु सिंधुदुर्गात गोंधळ झाल्यामुळे तेथील कार्यकारणी आम्हाला बरखास्त करावी लागली. अन्यथा लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसला, असे नांदगावकर म्हणाले. लोक या सगळ्या राजकारणाला कंटाळलेले आहेत. त्यांना बदल पाहिजे ही त्यांची देहबोली आम्हाला दिसत होती. त्यामुळे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली या ठिकाणी जे प्रचंड कोकणी बांधव आहेत, जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना कोकणात पाठवायचे आणि तिकडे गड मजबूत करायचा आहे. त्याठिकाणी राज ठाकरे यांच्या सभा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये लावण्यात आल्या आहेत, असेही नांदगावकर म्हणाले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/1rIUwps

No comments:

Post a Comment