Breaking

Friday, December 16, 2022

नागपुरात मादी श्वानावर बलात्कार, विकृत व्यक्तीच्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल, पोलिसांकडून अटक https://ift.tt/lcQF2vn

नागपूर : एका मादी श्वानावर उद्यानामध्ये बलात्कार करणाऱ्या विकृत व्यक्तीला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. देवेंद्र भगत (वय ४०) असे आरोपीचे नाव असून, तो विवाहित आहे व मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. ही घटना गुरुवारी मानेवाडा-बेसा मार्गावरील शाहूनगर उद्यान परिसरात घडली. येथे दुपारी १ वाजताच्या सुमारास भगतने मोकाट फिरणाऱ्या मादी श्वानाला पकडून तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडिओ तयार केला व आपल्या मित्रांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाकला. या ग्रुपमधील पार्थ भोसे हा महाविद्यालयीन विद्यार्थी त्याच परिसरात राहणारा आहे. त्याने व्हिडिओ टाकणाऱ्याकडून आणखी माहिती घेतली व श्वानांसाठी काम करणाऱ्या बार्क क्लब या स्वयंसेवी संघटनेशी संपर्क साधला. त्यानंतर संघटनेचे प्रतिनिधी आले व त्यांनी पार्थला या प्रकरणाची पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. पार्थच्या तक्रारीनंतर हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला भादंवि कलम २९४, ३७७ तसेच पशुक्रूरता कायद्यान्वये अटक केली. दरम्यान, बार्क क्लबने या मादी श्वानाचा शोध घेऊन तिच्यावर प्रथमोपचार केले. ‘तिची वैद्यकीय तपासणीही करायची आहे. मात्र, तिला पकडायला गेल्यास ती अंगावर धावून येते. तिला माणसासारखे समजत नसले तरी या प्रकारामुळे तिचा मानवप्राण्यावर विश्वास राहिला नाही. आता प्रत्येकाच्या अंगावर ती धावून जात आहे’, असे बार्क क्लबच्या तान्या दुबे यांनी ‘मटा’ला सांगितले.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/V1L5KOk

No comments:

Post a Comment