बुलढाणा : संक्रांतीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संक्रातीच्या सणाला लहान मुलांमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धाच लागली असते. पण ही स्पर्धा एखाद्याच्या जीवावर देखील बेतू शकते. अनेक वेळा पतंगीच्या नायलॉन मांजामुळे पक्षांना ईजा पोहोचू शकते. इतकेच नाही, तर रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीला देखील दुखापत होऊ शकते. मांज्यामुळे एखादा मोठा अपघात होणे किंबहुना जीव जाणे ही शक्यताही नाकारता येत नाही.अशीच काहीशी घटना बुलढाण्यात घडली. येथे काढत असताना एका मुलाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज (बुधवार) दुपारी बुलढाणा शहरातील वावरे यांच्या बिल्डिंगचे सुरू असलेल्या बांधकामावरील दुसऱ्या मजल्यावर पतंग काढण्यासाठी प्रणव विनोद बोरकर (१३) हा मुलगा गेला. प्रणवने पतंग काढण्यासाठी लोखंडी सळी हातात घेतली व तो पतंग काढू लागला. यावेळी त्याच्या हातातील लोखंडी सळीचा विद्युत तारेला स्पर्श झाला. यामुळे विजेचा धक्का लागूव प्रणवचा मृत्यू झाला. क्लिक करा आणि वाचा- या दुर्दैवी घटनेबाबत पोलिसांना कळतात पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मुलाला जिल्हा सामान्य रुग्णाला उपचार करता आणले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करीत आहे .एकंदरीत घडलेल्या या प्रकरणामुळे परिसरात सर्वत्र हळ हळ व्यक्त केली जात आहे. क्लिक करा आणि वाचा- पतंग उडवताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता अनेक वेळा पतंग उडवताना आजूबाजूच्या विद्युत खांबांकडे दुर्लक्ष केल्या जाते. पतंग उडवताना विशेषतः लहान मुलांसोबत कोणीही घरातील मोठी व्यक्ती नसते. पतंग काढताना थेट लोखंडी साहित्याचा वापर केला जातो. यामुळे विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. यामुळे संक्रांतीच्या दिवसांमध्ये पतंग उडवताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहेत. याबरोबरच नायलॉन मांजाचा देखील वापर टाळला पाहिजे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Du9sZ2m
No comments:
Post a Comment