पुणे : सकाळी साडेनऊची वेळ...खडकी रेल्वे स्टेशन येथे मुंबई-चेन्नई विशेष गाडीच्या स्लिपर कोचला आग लागल्याचा रेल्वे नियंत्रण कक्षाला फोन येतो...तत्काळ रेल्वेच्या अपघात मदत व वैद्यकीय मदत गाड्या घटनास्थळाकडे रवाना होतात...पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकासह सर्व अधिकारी मदतीसाठी खडकी रेल्वे स्टेशनकडे धाव घेतात...पण, शेवटी हे ‘मॉकड्रील’ असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वेमध्ये आग व इतर अपघात झाल्यास मदतकार्य व प्रवाशांना वाचवण्यासाठी किती वेळात यंत्रणा पोहचतात यासाठी रेल्वेकडून शुक्रवारी सकाळी 'मॉकड्रील' आयोजित करण्यात आले होते. त्याची माहिती कोणालाही देण्यात आलेली नव्हती. खडकी रेल्वे स्टेशनवर मुंबई-चेन्नई गाडीतील स्पीलर कोचला आग लागल्याचा फोन खडकी स्टेशन मास्तर यांनी रेल्व नियंत्रण कक्षाला सकाळी ९ वाजून २२ मिनिटांनी केला. रेल्वे गाडीला आग लागल्याचे समजताच रेल्वेच्या सर्व यंत्रणा व अधिकाऱ्यांची धावपळ उडाली आणि सर्वजण कामाला लागले. आग लागलेल्या गाडीतील प्रवाशांना मदत करण्यासाठी आणि आग विझवण्यासाठी तत्काळ अपघात मदत रेल्वे आणि वैद्यकीय मदत रेल्वे गाड्या तत्काळ घटनास्थळाकडे रवाना झाल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदु राणी दुबे, अपर व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह, वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी देखील तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वेचे सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तसंच एनडीआरएफ, रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी दाखल झाले होते. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा अर्ध्या तासात पोहोचल्या. त्यांनी मदतीला सुरूवात केली. शेवटी हा सर्व मॉकड्रीलचा भाग असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/lSynBmD
No comments:
Post a Comment