Breaking

Friday, December 2, 2022

राज्यात १० महिन्यात १० हजार बालमृत्यू, कारणं प्रत्येक पालकाने वाचली पाहिजे.... https://ift.tt/Qn4UYKe

Sharmila.Kalgutkar@timesgroup.com Tweet : @ksharmilaMT मुंबई : गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे राज्याच्या ढासळलेल्या आरोग्य व्यवस्थेवर बोट ठेवले जात असतानाच दहा महिन्यांत झालेल्या १०,२८५ बालमृत्यूंनी यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. बालकांच्या आरोग्याबाबत यंत्रणांच्या पातळीवर असलेल्या निष्काळजीने बालमृत्यूंचा अस्वस्थ करणारा आकडा समोर आला आहे. 'मटा'कडे असलेल्या माहितीनुसार गेल्या दहा महिन्यांत राज्यात १०,२८५ बालकांचा मृत्यू झाला असून, यात आदिवासी भागामध्ये झालेल्या बालमृत्यूंची संख्या १,९३१ आहे. शून्य ते एक या वयोगटामधील ८,०६१ तर १ ते ५ वर्ष वयोगटातील २,२२४ बालमृत्यू झाले आहेत. करोना संसर्गावर मात करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून आरोग्ययंत्रणा काम करीत असताना महिला व बालकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे लसीकरणापासून इतर अनेक पातळ्यावंर दुर्लक्ष झाल्याचे विदारक वास्तव कुपोषण व बालमृत्यूंच्या आकड्यांतून स्पष्ट झाले आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या कुपोषित बालकांमध्ये मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असते. गोवरासारख्या संसर्गामध्ये कुपोषित बालकांची मृत्युमुखी पडलेली संख्या सर्वाधिक असल्याचे बालरोगतज्ज्ञांकडून सातत्याने सांगितले जात आहे. गोवर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. सुभाष साळुंखे यांनीही कुपोषित बालके शोधून त्यांच्या आरोग्य व पोषणाच्या मुद्द्यांवर प्राधान्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. या गंभीर समस्येबाबत आरोग्य विभाग तातडीने कोणत्या उपाययोजना करणार आहे, हे जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी सातत्याने संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. काय आहेत कारणे? थांबलेले-चुकलेले लसीकरण, बंद असलेल्या अंगणवाड्या, आहार-पोषणाच्या संदर्भात न झालेले सर्वेक्षण, पुरेशा पोषण आहाराचा अभाव, रोजगार गमावल्यामुळे आलेली भ्रांत, कुपोषत माता, अपुऱ्या दिवसांची प्रसूती बालमृत्यूच्या प्रश्नावर सोमवारी बैठक बोलावली असून, यामध्ये उपाययोजनांबाबत विचारविनिमय आणि आखणी होईल.- मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/g5b9h4S

No comments:

Post a Comment