सोलापूर : डॉक्टर असद मुन्शी यांची पत्नी फलकनाज ही अनेक महिन्यांपासून विभक्त राहत होती. फलकनाज यांचे अनैतिक संबंध आहेत आणि याला मृत डॉ. असद मुन्शी यांच्या सासू-सासऱ्यांची व मेहुण्याची मूकसंमती होती. या सर्वांनी डॉ. असद मुन्शी यास मानसिक त्रास दिला होता. तसेच आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशा आशयाची फिर्याद मृत डॉक्टरचे भाऊ अहमद मो. शाहनवाज मुन्शी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी फलकनाज नजीर अहमद सय्यद, सर्फराज नजीर अहमद सय्यद, नजीर अहमद सय्यद, निखत सय्यद (सर्व रा,मोहिते नगर,सोलापूर शहर), आणि डॉ. मिलिंद सरोदे (रा. जळगाव) यांच्या विरोधात भा.द.वि. ३०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक तपास एपीआय पेठकर करत आहेत. मुलीला भेटू दिले जात नव्हते डॉ. मुन्शी यांची पत्नी फलकनाज ही पतीपासून अनेक महिन्यांपासून विभक्त राहत होती. डॉ. असद व फलकनाज यांना एक मुलगीही आहे. डॉ. असद मुन्शी यांना मानसिक त्रास देत मुलीला भेटू दिले जात नव्हते. मुलीला अपार प्रेम करत असल्याने डॉ. असद हे नेहमी मुलीला भेटण्याचा प्रयत्न करत होते. पण पत्नी फलकनाज ही मुलीला भेटू देत नव्हती. त्यामुळे डॉ. असद मुन्शी हे मानसिकरित्या खचले होते. डॉ. मिलिंद सरोदे यांनी देखील डॉ. असदचे भाऊ असदुल्ला मुन्शी यांना कॉल करून फलकनाजसोबत आपले संबंध आहेत, अशीही माहिती देत खासगी आयुष्यात ढवळाढवळ केली होती. त्यामुळे डॉ. असद यांनी टोकाचा निर्णय घेत ३ डिसेंबरला स्वतःचे आयुष्य संपविले होते, अशी फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. सोलापुरातील सामाजिक कार्यात सक्रिय होते डॉ. मुन्शी डॉ. असद मुंशी हे काँग्रेस सोबत सामाजिक कार्यात सक्रिय होते. 'हिजामा कैंम्पच्या' माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. ३ डिसेंबरला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शहरातील कर्णिक नगर येथे राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. त्यांना तातडीने मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर मार्कंडेय रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. काँग्रेसचे वरीष्ठ नेते देखील रुग्णालयात दाखल झाले होते. डॉ. असद मुन्शी यांच्या अंतिम संस्काराला मोठी गर्दी झाली होती. सोलापूर शहरात एका प्रतिष्ठित डॉक्टराने आत्महत्या केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. अखेर या सर्व प्रकरणात तपास करत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/secm90n
No comments:
Post a Comment