Breaking

Saturday, December 17, 2022

जळगाव जमोदमध्ये धक्कादायक प्रकार; बसमध्ये तरुणांकडून मुलींचा विनयभंग, केली मारहाण https://ift.tt/tDJjbux

बुलडाणा : जळगाव जामोद येथील खांडवी बस स्टॉप वर काल १६ डिसेंबरच्या संध्याकाळी चांगलाच राडा झाला. खांडवी येथील सहा तरुणांनी एसटी बस मध्येचढून मुलींची छेड काढली. एवढेच नव्हे तर मुलींना मारहाणही केली. या मुली जळगाव जामोद येथील एसकेके कॉलेजमध्ये शिकतात. त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथून एसटी बसने जाणे येणे करतात. दरम्यान, मुलींच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलिसांनी खांडवी येथील सहा जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताई तालुक्यातील वडोदा येथून काही मुली व मुले जळगाव जामोद येथे शिकण्यासाठी येतात. या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जळगाव जामोद बसडेपोच्या वतीने जळगाव जामोद ते वडोदा अशी सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, काल सायंकाळी वडोदा येथील मुली आणि मुले बसमध्ये बसून वडोदा येथे जात होते. बस खांडवी स्टॉप वर थांबली असता. तेथील सहा तरुण गाडीत चडले. त्या सहा जणांनी वडोदा येतील धनेश सुनील पुसे याला मारहाण करायला सुरुवात केली. क्लिक करा आणि वाचा- त्याचवेळी गाडीत बसलेल्या वडोदा गावच्या मुलींनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्या सहा पोरानी मोर्चा मुलींकडे वळवला. मुलींचीही छेड काढली. त्यांचे केस ओढण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. मुलींच्या तक्रारीवरून खांडवी येथील विशाल डोंगरदिवे, अजय डोंगरदिवे, रोशन पंढरी डोंगरदिवे ,विकास साहेबराव डोंगरदिवे यांच्यासह दोन अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. क्लिक करा आणि वाचा- मुलींना सातत्याने होत असलेला त्रास त्वरीत थांबावा अशी विद्यार्थिनींकडून तशी मागणी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये दादागिरी करणारी मुले प्रवास करत असतात. त्यामुळे बस स्टॉपवर पोलिसांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. क्लिक करा आणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/L8xnSfP

No comments:

Post a Comment