म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई () यांच्या नावाचा वापर करून त्यांची '' () या कार्यक्रमाचा सार ग्रंथ प्रकाशन करण्यासाठी विविध मार्गाने निधी गोळा करून नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभ्युदय वात्सल्यम या संस्थेचे संस्थापक आलोकरंजन तिवारी यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. 'अभ्युदय वात्सल्यम' या संस्थेचे संस्थापक आणि मासिकाचा संपादक आलोक तिवारी याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करून आतापर्यंत झालेल्या "मन की बात" या कार्यक्रमाच्या भाषणाचा 'सार ग्रंथ' तयार करीत आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन हे मार्च २०२३ मध्ये राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करणार आहै. याचा तपशीलवार माहिती देणारे माहितीपत्रक समाज माध्यमांवर व्हायरल केले. क्लिक करा आणि वाचा- या पुस्तिकेसाठी पंतप्रधानांचे नाव सांगून निधी जमा केला जात होता. कांदिवली येथील एका नागरिकाकडून ४ हजार रुपये घेतल्यानंतर त्याने याबाबत तक्रार केली. क्लिक करा आणि वाचा- गुन्हे शाखा युनिट ११ च्या पथकाने याबाबत प्राथमिक चौकशी केली असता कोणतीही परवानगी नसताना तिवारी दिशाभूल करून फसवणूक करीत असल्याचे आढळले. त्यामुळे तिवारी आणि पदाधिकाऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करून त्यांनी किती जणांची फसवणूक केली याचा तपास गुन्हे शाखा करीत आहे. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/CLZOBTQ
No comments:
Post a Comment