जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादीचे खासदार, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झाली. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्ट्रक्शन कार्यालयाचे अमोल कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अमोल कोल्हेंचे पेशवाई पगडी घालून स्वागत करण्यात आले. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या कारमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. यामुळे जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि अमोल कोल्हे यांची जालन्यात भेट झाली. रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे यांच्या कन्स्ट्रक्शन कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ही भेट झाली. विशेष म्हणजे या उद्घाटनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दानवे यांच्या गाडीतच तबल २५ मिनिटे गुप्त चर्चा झाल्याचे कळते आहे. मात्र, या चर्चेचा तपशील कळू शकलेला नाही. या भेटीबाबत माहिती घेतली असता औरंगाबाद येथे २३ ते २८ दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्य होणार आहे. याचं निमंत्रण देण्यासाठी अमोल कोल्हेंनी ही भेट घेतल्याचं बोललं जातंय. पण रावसाहेब दानवे हे मुरब्बी राजकारणी असल्याने राजकारणातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ux6HBTK
No comments:
Post a Comment