Breaking

Saturday, December 3, 2022

USA vs Netherlands : अमेरिकेचे स्वप्न भंगले; नेदरलँड्स बनला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला संघ https://ift.tt/Zv28dJ9

दोहा : कतार ज्याचे यजमानपद भूषवित आहे त्या FIFA विश्वचषक २०२२ या हंगामात प्री क्वॉर्टर फायनल फेरीचा पहिला सामना शनिवारी (३ डिसेंबर) खेळला गेला. हा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स यांच्यात रंगला होता. हा सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात नेदरलँड्सने अमेरिकेवर ३-१ असा दणदणीत विजय नोंदवला. अशा प्रकारे उपांत्यपूर्व फेरी गाठणारा नेदरलँड्स हा पहिला संघ ठरला. नेदरलँड्सचा संघ गेल्या विश्वचषक २०१८ मध्ये पात्र ठरू शकला नव्हता. हा संघ १९७४, १९७८ आणि २०१० मध्ये तीन वेळा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला. परंतु प्रत्येक वेळी हा संघ उपविजेता राहिला. यावेळी नेदरलँड्स संघाला विजेतेपदाची सुवर्णसंधी आहे. दुसरीकडे अमेरिकन संघाचे उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले आहे. यापूर्वी २००२ च्या विश्वचषकात त्याने ही कामगिरी केली होती. त्यानंतर अमेरिकेचा संघ कोणत्याही विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. या सामन्यात असे गोल केले पहिला गोल: १० व्या मिनिटाला डमफ्रीजच्या मदतीने दिपयने गोल डागला. दुसरा गोल: ४५+१ मिनिटात डमफ्रीजच्या मदतीने ब्लिंडने गोल केला. तिसरा गोल: हाजी राइटने ७६ व्या मिनिटाला अमेरिकेसाठी गोल केला. चौथा गोल: नेदरलँड्ससाठी डमफ्रीजने ८१व्या मिनिटाला गोल केला. डेपेने पहिला गोल केला, तर ब्लिंडने दुसरा गोल केला उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड संघाने सुरुवातीपासूनच अमेरिकेवर वर्चस्व राखले. सामन्यातील पहिला गोल १० व्या मिनिटालाच झाला. हा गोल नेदरलँडसाठी मेम्फिस डेपेने केला. स्पॅनिश क्लब बार्सिलोनाकडून खेळणाऱ्या डेपेच्या या गोलला डेन्झेल डमफ्रीजने मदत केली. सामन्याचा पूर्वार्ध संपल्यानंतर दुखापतीसाठीची वेळ मिळाली. नेदरलँड संघानेही १-० अशी आघाडी कायम ठेवली होती. मात्र अतिरिक्त वेळेत डेली ब्लाइंडने आपली ताकद दाखवत ४५+१ मिनिटात गोल करत नेदरलँड्स संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ब्लाइंडचा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा तिसरा गोल होता. सामन्यातील हा दुसरा गोलही डेन्झेल डमफ्रीजने केला. डम्फ्रीझच्या गोलवर अमेरिकेने फेरले पाणी सामन्याच्या उत्तरार्धात अमेरिकन संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने ७६ व्या मिनिटाला पहिला गोल केला. हाजी राइटने हा गोल करून संघाला सामन्यात १-२ अशी बरोबरी साधून दिली. पण पाच मिनिटांनंतर डम्फ्रीझने गोल करत नेदरलँड्सचा सामना ३-१ असा केला आणि अशा प्रकारे त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात अमेरिका-नेदरलँड्सची स्टार्टिंग- ११ नेदरलँड्स संघ: व्हर्जिल व्हॅन डायक (कर्णधार), अँड्रिज नोपर्ट (गोलकीपर), डेन्झेल डम्फ्रीझ, ज्युरियन टिंबर्स, नॅथन एके, मार्टेन डी रून, फ्रँकी डी जोंग, डेव्ही क्लासेन, डेली ब्लिंड, कोडी गॅक्पो आणि मेम्फिस डेपे. यूएस संघ: मॅट टर्नर (गोलकीपर), सर्जिनो डेस्ट, वॉकर झिमरमन, टायलर अ‍ॅडम्स, टिम रीम, अँटोइन रॉबिन्सन, वेस्टन मॅकेनी, ख्रिश्चन पुलिसिक, युनेस मुसाह, टिम वेह आणि जीसस फरेरा.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QbH1x6z

No comments:

Post a Comment