दोहा : जपानने जमर्नीला धक्का देत मध्ये यापूर्वीच धक्का दिला होता. पण आजच्या क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यातही जपानने जिगरबाज खेळ केला. कारण फुटबॉलमध्ये क्रोएशिया हा दिग्गज संघ समजला जातो. जपानने या सामन्याच्या पहिल्या सत्रात तर १-० अशी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गोल झाला. त्यामुळे क्रोएशिया सामना जिंकेल, असे वाटत होते. पण जपानने जोरदार बचाव करत हा सामना तब्बल १२० मिनिटांपर्यंत १-१ अशा बरोबरीत ठेवला. त्यामुळे हा सामना पेनेल्टी शुटआऊटमध्ये गेला आणि क्रोएशियाने ३-१ अशी बाजी मारली. पण हा सामना जपानने गमावला असला तरी त्यांनी चाहत्यांची मनं मात्र नक्कीच जिंकली. जपानने पहिल्या सत्रात चांगली कामगिरी केली. सामन्याच्या सुरुवातीला क्रोएशियाचा संघ चांगलाच आक्रमक झाला होता. पण क्रोएशियाच्या आक्रमणाला जपानने यावेळी चांगलेच थोपवले. पण जपानचा संघ फक्त या एकाच गोष्टीवर थांबला नाही, तर त्यांना बचाव करत असताना आक्रमणावरही जोर दिला. या गोष्टीचा फायदा जपानच्या संघाला पहिल्या सत्रात झाला. कारण सामन्याच्या ४३ व्या मिनिटाला जपानच्या डी. माएडाने गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात जपानने १-० अशी आघाडी कायम राखली होती. दुसऱ्या सत्रातही त्यांना क्रोएशियाला चांगली झुंज दिली. पण क्रोएशियाच्या पेरेसिकने सामन्याच्या ५५ व्या मिनिटाला गोल केला आणि सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर हा सामना क्रोएशिया जिंकेल, असे काही जणांना वाटत होते. पण त्यावेळी जपानने सर्वांनाच धक्का दिला. कारण त्यानंतर जपानने आपला बचाव एवढा मजबूत केला की, त्यांच्याविरोधात ९० मिनिटांत त्यानंतर एकही गोल झाला नाही. त्यानंतर अर्ध्या तासांचा अतिरीक्त वेळ देण्यात आला. या अर्ध्या तासातही जपानने चांगली झुंज दिली आणि गोल होऊ दिला नाही. त्यामुळे हा सामना पेनेल्टी शुटआऊटमध्ये गेला. पेनेल्टी शुटआऊटमध्ये क्रोएशियाने ३-२ अशी बाजी मारली आणि त्यांनी पुढच्या फेरीत प्रवेश केला. जपानचा संघ या सामन्यात एवढी चांगली कामगिरी करेल, असे कोणाच्याही गावी नव्हते. कारण क्रोएशिया हा फुटबॉल विश्वातील दिग्गज आणि अनुभवी संघ आहे. त्यांच्यापुढे जपानचा निकाल लागणार नाही, असे म्हटले जात होते. पण जपानने यावेळी क्रोएशियाला चांगली लढत दिली आणि सामन्यात चांगलीच रंगत भरली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/TzPWN1D
No comments:
Post a Comment