Breaking

Thursday, January 5, 2023

जबरदस्त! अक्षर पटेलने हसरंगाला धुतले, इतिहास रचत असा विक्रम करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू https://ift.tt/bmx4Spq

पुणे : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला १६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षर पटेलने आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांना हवाच काढली. अक्षरने टीम इंडियासाठी ३१ चेंडूत ६५ धावांची दमदार खेळी करत इतिहास रचला. अक्षने आपल्या खेळीत सहा षटकार आणि तीन चौकारही लगावले. एवढेच नाही तर अक्षरने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतकही पूर्ण केले. या खेळीदरम्यान विशेषत: श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या चेंडूंवर तुफानी फटकेबाजी केली. टी-२० सामन्यात सातव्या विकेटनंतर ६५ धावांची खेळी करणारा पटेल हा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. पटेलने रवींद्र जडेजाला मागे सारत हा विक्रम केला. जडेजाने २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४४ धावांची नाबाद खेळी केली होती. श्रीलंकेसाठी १४ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हसरंगाला अक्षर पटेलने पहिल्याच चेंडूवरय लक्ष्य केले. हसरंगाच्या पहिल्या चेंडूवर अक्षरने डीप स्क्वेअरच्या दिशेने स्लॉग स्वीप करत त्याच्या खात्यात ६ धावा जोडल्या. दुसऱ्या चेंडूवरही तीच परिस्थिती केली. अक्षरने स्लॉग स्वीप मारून सहा धावा काढल्या. तर तिसऱ्या चेंडूवर त्याने शानदार षटकार खेचून श्रीलंकेच्या छावणीला खिंडार पाडले. क्लिक करा आणि वाचा- पटेलच्या या सलग तीन षटकारांनी सामना पूर्णपणे फिरवला. यादरम्यान त्याला सूर्यकुमार यादव (५१) यांचीही पूर्ण साथ मिळत होती. एक वेळ अशी होती की सामना पूर्णपणे टीम इंडियाच्या ताब्यात होता, पण शेवटी सूर्यकुमार यादव आणि पटेल बाद झाल्यामुळे श्रीलंकेने सामना आपल्या बाजूने फिरवला. हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकली मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावातील पहिले षटक कर्णधाराने स्वत: टाकले पण त्यानंतर पॉवर प्लेमध्ये दुसरे षटक टाकायला आलेल्या अर्शदीप सिंगने आपली लय गमावली. अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात सलग तीन नो बॉल टाकले, त्यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांना आयती संधीच मिळाली. त्यानंतर कुशल मेंडिस आणि पथुम निशांक यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. या सामन्यात मेंडिसने ३१ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली. त्याला युझवेंद्र चहलने एलबीडब्ल्यू केले. क्लिक करा आणि वाचा- यानंतरही भारतीय गोलंदाजांचा संघर्ष सुरूच राहिला आणि अखेरच्या षटकात दासून शनाकाने स्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या २०० धावांच्या पुढे नेली. शनाकाने या सामन्यात केवळ २२ चेंडूत ५६ धावा केल्या. याशिवाय पठुन निशांकाने ३३ तर चरित अस्लंकाने ३७ धावांचे योगदान दिले. क्लिक करा आणि वाचा- उमरान मलिकने तीन बळी घेतले भारताकडून उमरान मलिकने गोलंदाजीत तीन बळी घेतले. मात्र, धावा देण्याच्या बाबतीत तो चांगलाच महागडा ठरला. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये ४८ धावा दिल्या. उमरानाशिवाय अक्षर पटेलनेही दोन तर युझवेंद्र चहलनेही एक विकेट घेतली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/sFGBdZL

No comments:

Post a Comment