Breaking

Monday, January 2, 2023

बुलढाण्यात खळबळ! स्टेट बँक मॅनेजरची गळा चिरुन हत्या; नाल्यामध्ये आढळला मृतदेह https://ift.tt/hyrTiCW

: बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँकेत कार्यरत असलेल्या मॅनेजरची अज्ञातांनी धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. उत्कर्ष एकनाथ पाटील (वय वर्ष ३८) रा. मुंबई हे हिरडव येथील स्टेट बँकेच्या शाखेत सहाय्यक मॅनेजर म्हणून कार्यरत होते. दरम्यान काल सायंकाळी सारंगपूर शिवारातील एका शेतालगतच्या नाल्यामध्ये उत्कर्ष पाटील यांचा गळा चिरलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. क्लिक करा आणि वाचा- याबाबत कळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह व ताब्यात घेतला. यावेळी पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता मृतदेह आढळलेल्या नाल्यानजीकच्या शेतामध्ये रक्त लागलेले धारदार शस्त्र तसेच मृतकाचा एक बुट पडलेला दिसून आला. यावरुन पोलिसांनी अज्ञाताविरुध्द कलम ३०२, २०१ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा ाणि वाचा-


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/KUfkXy1

No comments:

Post a Comment