जळगाव : जळगाव शहरात अवजड वाहनांना बंदी असतानाही एक परप्रांतीय वाहन चालक थेट ट्रक घेऊन जळगाव शहरात घुसला. यादरम्यान मद्याच्या नशेत या चालकाने तीन ते चार दुचाकीस्वारांना धडक दिली. तसेच त्याने बसलाही धडक दिली. मात्र सुदैवाने यापूर्वीच नागरिकांनी हा ट्रक थांबवून चालकाला खाली उतरवून चांगलाच चोप देत, पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जळगावकरांनी हा थरार अनुभवला.जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्यधुंद ट्रक चालकाने अंधाधुंद पद्धतीने त्याच्या ताब्यातील वाहन चालवीत पुढे चालणाऱ्या बससह पाच दुचाकींना धडक दिल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. यावेळी नागरीकांनी ट्रकचालकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.क्लिक करा आणि वाचा- जळगाव शहरातील नवीपेठ भागातील गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान असलेल्या विद्या निकेतन महाविद्यालयाजवळून ट्रक क्रमांक (एचएच ३४ एव्ही १४५३) जात होता. या ट्रकवरील चालक यांने मद्य प्राशन केलेले होते. यावेळी त्याने दारूच्या नशेत बस आणि इतर पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, अश्या परिस्थितीत अपघातावरीन नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. यावेळी काही सुज्ञ नागरीक व तरुणांच्या सहकार्याने विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ ट्रक थांबवून मद्यधुंद चालकाचा खाली उतरविले. तसेच ट्रकच्या धडकेमुळे जखमी झालेल्या संतप्त दुचाकीस्वार व इतरांनी ट्रकचालकाला कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिला व पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. या वेळी वाहतूकीची मोठी कोंडी होवून वाहतूक विस्कळीत झाली होती. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/oaR8s2J
No comments:
Post a Comment