मुंबई: केळी हे एक असं फळ आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोशकतत्त्व असतात. त्यामुळे डॉक्टरही केळी खाण्याचा सल्ला देत असतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की केळीचा आकार हा वाकडा का असतो सरळ का नसतो. म्हणजे तो सरळं पण असू शकत होती ना पण केळी ही नेहमी वाकडी असते. असं का होत असेल. यामागील कारण काय असेल, तुमच्या याच सर्व प्रश्नांची उत्तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. केळी वाकड्या का असतात?इतर फळांप्रमाणे केळी देखील झाडावर लागतात. अनेक फळांप्रमाणे आधी झाडावर फूल येतं आणि मग त्या फुलाच्या पाकळ्यांखाली केळी येतात. जेव्हा केळी आकाराने खूप मोठी होतात तेव्हा केळी निगेटिव्ह जिओट्रोपिझम नावाच्या प्रक्रियेतून जातात. ज्याचा अर्थ असा होतो की केळी या जमिनीच्या दिशेने वाढण्याऐवजी ते सूर्यप्रकाशासाठी सूर्याच्या दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने वळू लागतात. या प्रवृत्तीमुळे केळी वरच्या दिशेने वाढू लागतात, त्यामुळे केळीचा आकार हा वाकडा असतो.हेही वाचा -केळीचा इतिहास कायकेळीची झाडे सर्वप्रथम रेनफॉरेस्टच्या मध्यभागी उगवत होती. त्याठिकाणी सूर्यप्रकाश फारच कमी प्रमाणात पोहोचायचा. त्यामुळे सूर्यप्रकाशासाठी केळी वरच्या बाजुने वाढू लागली. अशा परिस्थितीत केळीच्या झाडांना तशीच सवय झाली. त्यामुळे केळी आधी जमिनीच्या दिशेने वाढतात आणि त्यानंतर ती प्रकाशाच्या दिशेने वर वाढतात, त्यामुळे केळीचा आकार वाकडा असतो. ४ हजार वर्षांपूर्वी मलेशियामध्ये सर्वप्रथम केळीची लागवड झाली, असं मानलं जातं.हेही वाचा -सूर्यफुलाचं झाडंही असंच प्रोसेस करतंकेळीचं झाड हे एकमेव असं झाड नाही जे नकारात्मक जिओट्रोपिझमशी संबंधित आहे. सूर्यफुलाचं झाडंही असंच करतं. सूर्य जिकडे जातो तिकडे सूर्यफुलाचे फूलही वळते. म्हणजेच जिकडे सूर्यप्रकाश असतो त्या दिशेने सूर्यफूल वळतं, असंच केळीसोबतही घडतं.हेही वाचा -
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/HioTm8A
No comments:
Post a Comment