नाशिक : नाशिक शहरातून अपहरणाच्या घटना समोर येत असताना सिन्नर शहरातून महत्वाची माहिती समोर आली आहे. नाशिक येथील उद्योजक असलेल्या सुरेश कलंत्री यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र याची चर्चा सुरु आहे. सिन्नर शहरातील वावी वेस परिसरातून आज सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास १२ वर्षीय मुलाचे अपहरण घटना घडली आहे. चिराग तुषार कलंत्री असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. चिराग आपल्या मित्रांसोबत सायंकाळी हा घरासमोरील काळे वाड्या समोरील मोकळ्या जागेवर खेळत होता. यावेळी घराजवळून पांढऱ्या रंगाच्या ओमिनी कारमधून आलेल्या काही संशयितांनी चिरागला ओढून गाडीत टाकत पळ काढला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरड केला. तसेच परिसरातील नागरिकांनी ओमिनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी पळ काढला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरड केलाय तसेच परिसरातील नागरिकांनी ओमिनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी वाहनावर दगडफेक करत गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ओमिनी सुसाट वेगाने सिन्नर नगर परिषदेसमोरून फरार झाली. एकीकडे काही दिवसांपूर्वी बिपीन बाफना हत्या प्रकरणातील संशयितांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यांनी देखील प्रसिद्ध व्यावसायिक बाफना यांच्या मुलाचे अपहरण करुन खंडणी मागितली होती. शिवाय त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता सिन्नर शहर परिसरातून मुलाचे अपहरण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/ez5dmgy
No comments:
Post a Comment