Breaking

Friday, January 6, 2023

Yogesh Kadam : आमदार योगेश कदमांच्या कारचा कशेडी घाटात अपघात, किरकोळ दुखापत पण प्रकृती सुखरुप https://ift.tt/FUsiGSt

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या गाडीचा काही वेळापूर्वी म्हणजे सव्वा दहाच्या सुमारास पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे रायगड हद्दीत अपघात झाला आहे. अपघातात आमदार योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, ते सुदैवाने सुखरूप आहेत. त्यांच्या चालकाला देखील किरकोळ दुखापत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. चालकाला चोळई येथील शासकीय रूग्णालयात उपचाराकरीता दाखल केले आहे. रूग्णालयात आमदार योगेश कदम स्वतः उपस्थित आहेत. मागून आलेल्या टँकरची धडक इतकी जोरदार होती की, या अपघातात टॅंकर पलटी झाला आहे. यामध्ये आमदार योगेश कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र, ते सुखरूप आहेत ड्रायव्हर दीपक कदम हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आमदार योगेश कदम थोड्याच वेळात मुंबईकडे रवाना होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार योगेश कदम हे खेडकडून मुंबईला निघाले असता कशेडी घाटात पोलादपूर नजीक चोळई येथे मागून येणाऱ्या टँकरने जोरदार धडक दिली. यानंतर टँकर चालक पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार योगेश कदम यांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांची गाडी त्यांच्या पुढे असलेल्या पोलीस गाडीवर धडकली. यामध्ये आमदार कदम यांच्या गाडीचे मागच्या बाजूचे नुकसान झाले आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/aboIU8M

No comments:

Post a Comment