Breaking

Friday, February 3, 2023

वाहतूक नियमन करताना भोवळ येऊन कोसळले, पुण्यात कर्तव्यावरील पोलिसाचं हार्ट अटॅकनं निधन https://ift.tt/0EQfcZR

पुणे: सेनापती बापट चौक जंक्शन येथे वाहतूक नियमन करताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे (वय ५७, रा. शिवाजीनगर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. मोरे चतु:शृंगी वाहतूक विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता सेनापती बापट चौक जंक्शन येथे वाहतूक नियमन करीत असताना त्यांचा डावा हात दुखला आणि त्यांना चक्कर येऊन ते थेट जमिनीवर कोसळले. हेही वाचा -पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव यांनी त्यांना रिक्षातून रत्ना हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मोरे यांना खात्यांतर्गत नुकतीच पदोन्नती मिळाली होती. मोरे कर्तव्यनिष्ठ अधिकारी होते, असे चतु:शृंगी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक (वाहतूक) बी. डी. कोळी यांनी सांगितले.हेही वाचा -औरंगाबादेत वर्गात शिकवताना शिक्षकाला हार्ट अटॅककाहीच दिवसांपूर्वी शाळेत शिकवताना एका शिक्षकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. औरंगाबादेतील शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला होता. ४३ वर्षीय सुरेश निवृत्ती राऊत हे वर्गात शिकवत असताना त्यांना भोवळ आली आणि ते कोसळले. हे पाहून वर्गातील विद्यार्थी घाबरले आणि त्यांनी इतर शिक्षकांना बोलावलं. त्यानंतर शिक्षकांनी सुरेश राऊत यांना रुग्णालयात नेलं मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या बातमीने संपूर्ण गाव हळहळलं तर आवडते शिक्षक अचानक गेल्याने विद्यार्थ्यांच्या डोळ्यातूनही अश्रूच्या धारा वाहू लागल्या.हेही वाचा -


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/V1a2Urg

No comments:

Post a Comment