Breaking

Monday, February 20, 2023

अमेरिकेतही दुमदुमला शिवरायांचा जयजयकार! 'राजा शिवछत्रपती' कार्यक्रमातून शेकडोंनी घेतली प्रेरणा https://ift.tt/8UIFf3e

डॅलस (अमेरिका) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा सोहळा रविवारी जसा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ठिकठिकाणी उत्साहात साजरा झाला तसाच तो अमेरिकेतील डॅलस फोर्टवर्थ येथेही झाला. ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक, एक हजारहून अधिक शिवप्रेमींचा सहभाग तसेच शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, शिवजन्म, स्वराज्यस्थापना व शिवरायांचा राज्याभिषेक दाखवणारे १२५ कलाकारांचे दिमाखदार सादरीकरण अशा सोहळ्याने अमेरिकेतील रंगतदार ठरली.डॅलस फोर्टवर्थ महाराष्ट्र मंडळातर्फे आयोजित या सोहळ्यात तेथे स्थायिक असलेल्या शेकडो मराठी कुटुंबांनी सहभाग घेतला. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या गजरात मिरवणूक झाल्यानंतर सर्व सभासदांनी पिठलं, भाकरी, भुरका याचाही आस्वाद घेतला. डॅलसचे सुजित साठे यांनी शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन ‘राजा शिवछत्रपती’ हा कार्यक्रम १२५ कलाकारांच्या सहभागाने सादर केला. यामुळे शिवजयंतीचा आनंद द्विगुणित झाला. ‘यावर्षी शिवजयंती रविवारच्या दिवशी आल्याने मंडळाला प्रथमच भव्य आयोजन करण्याची संधी लाभली’, असे मंडळाचे सचिव संतोष देशमुख यांनी याबाबत सांगितले. तर ‘यंदाचा सोहळा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरला. नजरेत भरणारे नेपथ्य व सादरीकरण याबरोबरच सुजित साठे यांच्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले’, अशी प्रतिक्रिया मंडळाचे अध्यक्ष सतीश थोपटे यांनी व्यक्त केली. ‘जास्तीत जास्त सभासदांना आपल्या आराध्यदैवताच्या जयंती सोहळ्यात सामील होता यावे हा आयोजनामागचा हेतू होता’, असे मंडळाचे खजिनदार श्रीरंग गोल्हार यांनी सांगितले. रवींद्र खोकराळे, सचिन फुंडे, मंडळाची कार्यकारी समिती तसेच इतर स्वयंसेवकांच्या विशेष परिश्रमांनी शिवजयंती सोहळा लक्षवेधी ठरल्यानंतर असे कार्यक्रम भविष्यातही व्हावे, अशी भावना डॅलस फोर्टवर्थमधील अनेक मराठी कुटुंबांनी व्यक्त केली.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/bPjsJaB

No comments:

Post a Comment