मुंबई : एकीकडे रामचरितमानसवरून वाद सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जातिव्यवस्थेवर भाष्य केले आहे. ही देवाने नाही तर ती पंडितांनी निर्माण केली आहे. देवाने नेहमीच सांगितले आहे की माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पण पंडितांनी एक वर्गवारी केली जी चुकीची होती, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मुंबईत संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान संघ प्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. देशात विवेक, चेतना या सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, फक्त मते भिन्न आहेत.क्लिक करा आणि वाचा- सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, आमच्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आहे. याचा फायदा घेऊन आपल्या देशात हल्ले झाले. याचा बाहेरून आलेल्या लोकांनी फायदा घेतला. देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसत आहे का, असा सवाल त्यांनी केला. कोणताही ब्राह्मण तुम्हाला हे सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आपल्या आजीविकेचा अर्थ समाजाप्रती जबाबदारी हा देखील असतो. जर प्रत्येक काम समाजासाठी असते, तर मग कोणी उच्च, कोणी नीच, किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात, असेही भागवत म्हणाले.क्लिक करा आणि वाचा- भागवत यांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शनराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी त्यांचं स्वागत केलं. क्लिक करा आणि वाचा-
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/tLwazJW
No comments:
Post a Comment