Breaking

Friday, February 10, 2023

पांढऱ्या सोन्याला चांगला दर मिळणार का? कापसाच्या वायद्यांकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं https://ift.tt/EuxHSZY

बुलढाणा : जिल्ह्यात अतिवृष्टीने सुमारे दीड लाख हेक्टर वरील कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरासरी कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अलीकडे दिवसांमध्ये कापूस उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या तुलनेत कापसाला अपेक्षेप्रमाणं भाव मिळालेला नाही. खाजगी व्यापाऱ्यांकडे हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असला तरी अपेक्षेप्रमाणं दर मिळत नसल्यानं कापूस साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतकरी सध्या व्यापारांना कापसाची विक्री करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट झाली होती. प्रतिक्विंटल ८२०० ते ८५०० रुपयांपर्यंत असलेला कापूस आता आठ हजारांवर स्थिरावला आहे. बाजार भाव वाढेल या अपेक्षेनं शेतकरी कापूस साठवून ठेवत असल्याचं खामगाव येथील शेतकरी नरेंद्र देशमुख यांनी सांगितले. भावातसारखी घसरत होत असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विक्री करत आहे.कापसाच्या वायदा बाजार आता १३ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये आगामी परिस्थितीचा वेध घेतला असता तज्ज्ञांनी कापसाच्या दरात वाढीची शक्यता वर्तवली आहे. आगामी चार महिन्याच्या काळात कापसाच्या दराची स्थिती काय राहणार याचा अंदाज व्यापाऱ्यांना येत असल्याने कापसाची चमक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.कापसाचे बाजार भाव मागील आठवड्याचे१ फेब्रुवारी : ८१०० ते ८१५०२ फेब्रुवारी : ८१०० ते ८१५०३ फेब्रुवारी : ८०५० ते ८१००४ फेब्रुवारी : ८०५० ते ८१००६ फेब्रुवारी : ७९०० ते ७९५०७ फेब्रुवारी : ७९५० ते ८०००सरकीच्या दरात दोनशे रुपये पर्यंत कमी आलेली आहे त्यामुळे तेलाचे भावही कमी झाले आहेत. कापसाच्या दरातील दोनशे रुपयापर्यंत घट झालेली आहे, असे बाजार समितीचे सचिव एस. एम. भिसे यांनी सांगितले.दरम्यान, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्याच्या तुलनेत अकोला जिल्ह्यात चांगला दर मिळत आहे. अकोल्यातील अकोट बाजार समितीत कापसाचे दर ८५०० च्या दरम्यान असून शेतकऱ्यांना ९ हजारांपेक्षा अधिक दर मिळण्याची अपेक्षा आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/iswY9CW

No comments:

Post a Comment