Breaking

Wednesday, March 8, 2023

पुण्यात जागतिक महिला दिनाला गालबोट, दोन महिलांकडून आयुष्याची अखेर, परिसरात हळहळ... https://ift.tt/9MYp6jN

दौंड: आज संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मात्र, आजच्या दिवसाला गालबोट लागणारी घटना पुण्यातील दौंड तालुक्यात घडली आहे. येथे दोन महिलांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्री संपवली आहे. नेमकं महिला दिनाला या महिलांनी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशनअंतर्गत दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दोघींनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप पुढे आलेलं नाही. यमुना हनुमंत कारंडे यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यमुना कारंडे या पारगाव येथील राहणाऱ्या होत्या. तर पूनम बाळासो टेकवडे या २२ वर्षीय तरुणीने कासूर्डी येथे आत्महत्या केली आहे. दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या गावात या घटना घडल्या आहेत. यमुना हनुमंत कारंडे यांच्या आत्महत्येबाबत पती हनुमंत चंद्रकांत कारंडे यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली असून दुसऱ्या घटनेबाबत लक्ष्मण बजाबा खेनट यांनी माहिती दिली आहे.पूनम टेकवजे या तरुणीने घरात लोखंडी पत्र्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आलं आहे. तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. याप्रकरणाचा अधिक तपास यवत पोलीस करत आहे.जागतिक महिला दिनाच्या दिवशी ही घटना घडल्याने दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही आत्महत्यांचे कारण अद्याप समोर आलेले नाही. एकीकडे महिलांचा सन्मान होत असताना दुसरीकडे महिलांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दौंड तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून भीमा नदीत काही दिवसांपूर्वी सात जणांचे मृतदेह सापडले होते. संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ती घटना होती. मात्र, आज पुन्हा या दोन महिलांच्या आत्महत्येच्या घटनेने दौंड तालुका हादरला असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/53UJgn4

No comments:

Post a Comment