Breaking

Tuesday, March 14, 2023

तुरीमुळं दिलासा मिळाला, कापसाच्या दरात घसरण सुरुच, शेतकऱ्यांपुढं आता नवं संकट https://ift.tt/Hn02VRB

अकोला : अकोल्याच्या बाजार समितीमध्ये शेतकरी आपल्याकडे असलेल्या तुरीच्या विक्रीसाठी गर्दी करताना दिसत आहे. त्याचं कारण म्हणजे तुरीच्या पिकाला मिळणारा जादा दर हे आहे. आज पुन्हा कापसाच्या दराच्या तुलनेत तुरीला जादा भाव असल्याचे दिसून आले. यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जादा दर मिळत असल्याचा आनंद दिसत आहे. मात्र, कापसाच्या दरात होत सातत्याने होत असलेल्या घसरणमुळे कापूस उप्तादक शेतकरी चिंतेत आहे. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज मंगळवारी ५ हजार ५०० पासून ८ हजार ४२५ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव होता, तर सरासरी भाव ७ हजार ४०० रूपये इतका मिळाला असून आज २ हजार २०३ क्विंटल इतकी तूर खरेदी झाली आहे. काल ६ हजार ७०० पासून जास्तीत जास्त ८ हजार ५०० रूपयांपर्यत प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीला भाव होता. तर, सरासरी भाव ७ हजार ७०० रूपये इतका असून काल २ हजार ५६७ इतकी तुरीची खरेदी झाली होती. कालच्या तुरीच्या भावाच्या तुलनेत आज तुरीच्या दरात ७५ रुपयांनी घसरण झाली आहे. विदर्भातील कापसाचे पंढरी समजाल्या जाणाऱ्या अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज तुरीला ७ हजार २८० पासून ८ हजार ८० रूपांपर्यंत प्रतिक्विंटरप्रमाणे भाव होता. इथे १ हजार ६५ इतकी क्विंटल तुरीची आवक झाली आहे. सद्यस्थित तूर उत्पादक शेतकऱ्यांना जरी अच्छे दिन आले असले तरी मात्र हवा तसा भाव अजूनही नाहीये, अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.

आवक वाढल्याने कापसाचे भाव घसरले

मार्च महिना असल्याने देवाण-घेवाण व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जातात. त्यामुळे बँकेतील कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांना आपला कापूस मिळेल त्या भावात विक्री करावा लागत आहे. सद्यस्थितीत अनेक बाजारपेठेत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी गर्दी होत आहे, म्हणजेच कापसाची आवक वाढली आहे. आवक वाढल्यामुळे कापसाचे भाव कुठेतरी खालवल्या जात असल्याचे चित्र आहे, असे जाणकार सांगतात. अकोल्यातील अकोटच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आज कमीत कमी ७ हजार ७०० ते ८ हजार १९५ रुपयांपर्यंत प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर कापसाची आवक २ हजार १० क्विंटल इतकी झाली आहे. तसेच अकोल्याच्या कृषी बाजारात कापसाला ७ हजार ७ हजार ९०० रूपयांपर्यत भाव मिळाला असून सरासरी भाव ७ हजार ९०० रूपये इतका होता. म्हणजे कालच्या कापसाच्या दराच्या तुलनेत आज कापसाच्या दरात २० रुपयांनी अकोल्यात वाढ झाली आहे.

अकोल्यात हरभऱ्याच्या दरात दहा रुपयांनी वाढ

अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ४ हजार १०० पासून ४ हजार ७५० रूपयांपर्यत हरभऱ्याला प्रतिक्विंटलप्रमाणे भाव मिळाला. आज इथे ४ हजार ४५९ इतकी क्विंटल हरभऱ्याची आवक झाली आहे. दरम्यान काल या बाजारात कमीत कमी ४ हजार पासून जास्तीत जास्त ४ हजार ७६० रूपये इतका भाव हरभऱ्याला मिळाला होता. तर सरासरी भाव ४ हजार ४०० रूपये होता. आज या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान अकोटच्या बाजारात ४ हजार ३०० ते ४ हजार ६८० रूपयांपर्यत हरभऱ्याला भाव मिळाला. तर इथे २ हजार ४० क्विंटल इतका हरभऱ्याची खरेदी झाली आहे.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/W53M4h2

No comments:

Post a Comment