म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘कसब्या’त कोण गुलाल उधळणार आणि चिंचवडमध्ये नेमका कोणाचा निकाल लागणार, याविषयी १५ दिवसांपासून लागलेल्या उत्सुकतेचे उत्तर आज (बुधवारी) मिळणार आहे. भाजप-शिवसेना युती आणि महाविकास आघाडीच्या सत्तासंघर्षात जनता नेमकी कोणाच्या बाजूने आहे, याचा फैसला पोटनिवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आज, गुरुवारी लागणार आहे.‘कसब्या’ची मतमोजणी कोरेगाव पार्क येथे, तर चिंचवडची थेरगाव येथे सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल, असे प्रशासनाने म्हटले आहे. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन्हीही मतदारसंघातील पोटनिवडणुक झाली. निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली.‘कसब्या’त कोणाचा गुलाल ?भाजपकडून हेमंत रासने तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात या मतदारसंघात सरळ लढत होती. प्रचारादरम्यान अत्यंत चुरस पाहावयास मिळाल्याने पोलिसांकडूनही मतमोजणीदरम्यान; तसेच मोजणीनंतर पुरेशी खबरदारी घेण्यात आली आहे. या मतदारसंघाच्या पश्चिमेला ५६ हजार तर पूर्वेला ८२ हजार मतदान झाले आहे. शेवटच्या तासाभरात १६ हजार मतदान झाल्याने हे मतदान कोणाच्या पारड्यात पडेल, तो विजयी होईल.चिचंवडमध्ये जगतापांचा वारसदार कोण?लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी २६ फेब्रुवारीला मतदान झाले. निवडणुकीच्या रिंगणात २८ उमेदवार असले तरी तिरंगी लढत आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत आहे. पोटनिवडणूक असूनही ५०.४७ टक्के मतदान झाले. त्यामुळे वाढीव मतदान कोणाच्या पारड्यात पडणार, यावर निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे.अशी होणार मतमोजणी- ‘कसब्या’ची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) गोदामामध्ये, तर चिंचवडची थेरगाव येथील शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे सकाळी आठ वाजता सुरू होईल.- ‘कसब्या’त मतमोजणीच्या २० तर चिंचवडमध्ये ३७ फेऱ्या होतील.- ‘कसब्या’त तसेच चिंचवडमध्ये ‘ईव्हीएम’च्या मतमोजणीसाठी १४ टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि ‘सर्व्हिस व्होटर्स’साठीच्या ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम’ (इटीपीबीएस) प्रत्येकी एक टेबल असेल.- सुरुवातीला टपाली आणि ‘ईटीपीबीएस’ची मोजणी होणार आहे. त्यानंतर ‘ईव्हीएम’ मतमोजणीला सुरुवात होईल.- सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर ‘रँडम’पद्धतीने पाच ‘व्हीव्हीपॅट’ मशीनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. ‘कंट्रोल युनिट’वरील मतांची संख्या आणि ‘व्हीव्हीपॅट स्लिप्स’ची पडताळणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/edvo9mP
No comments:
Post a Comment