नवी दिल्ली: संशोधकांनी नॉर्थ डकोटा आणि कॅनडा दरम्यान ५.१८ लाख चौरस किलोमीटरच्या बाकेन फॉर्मेशन नावाच्या क्षेत्राचे परीक्षण केले. त्यांना तिथे एक ब्लॅक शेल आढळून आली आहे. बाकेन फॉर्मेशन हा अमेरिकेतील सर्वात मोठा नैसर्गिक वायू आणि तेलाचा साठा आहे. पण, या ब्लॅक शेलच्या अभ्यासात शास्त्रज्ञांच्या संशोधनात एक घाबरवणारी माहिती समोर आली आहे.पृथ्वीवरील ऑक्सिजनची पातळी अनेक वेळा कमी झाल्याचे आढळून आले आहे. हायड्रोजन सल्फाइडचा प्रसार सातत्याने वाढत आहे. यामुळे, डेव्होनियन कालखंडात, म्हणजे ४१.९ दशलक्ष वर्षे ते ३५.८९ दशलक्ष वर्षांपर्यंत जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विनाशाची प्रक्रिया सुरु राहिली. डेव्होनियन कालखंडाला Ages Of Fishes (माशांचं युग) असंही म्हणतात.जेव्हा समुद्राच्या तळामध्ये अल्गी (Algae) सडण्यास सुरवात होते तेव्हा हायड्रोजन सल्फाइड तयार होतो. त्यामुळे समुद्रातील ऑक्सिजनची पातळी झपाट्याने कमी होते. मेरीलँड विद्यापीठातील भूवैज्ञानिक अॅलन जे. कॉफमन यांनी सांगितले की, हायड्रोजन सल्फाइडच्या प्रसारामुळे यापूर्वीही अनेकदा मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. पण, त्याच्या परिणामांचा अभ्यास केला गेलेला नाही, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. डेव्होनियन काळात असे मासे होते ज्यांना जबडा नव्हता. त्यांना प्लाकोडर्म असे म्हणतात. हे मासे विशेषत: गोंडवाना आणि युरामेरिकामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. ट्रायलोबाइट्स आणि अमोनाईट्स देखील समुद्रात मोठ्या प्रमाणात होते. सुरुवातीच्या काळात जमिनीवर जंगले वाढत होती. ज्यामध्ये फर्न सारख्या वनस्पती होत्या. डेव्होनियन कालखंडाच्या मध्यापर्यंत, सागरी टेट्रापॉड टिकटालिक पाण्यातून जमिनीवर आला. या डेव्होनियन कालखंडात पाच मोठे सामूहिक विध्वंस झाले. तेव्हा त्या जीव आणि झाडांचा जन्म झाला जे आपण आज पाहत आहोत. मग शार्कसारखे मासे जन्माला आले, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं. समुद्रातून धोकादायक प्राणी येतील, माणसांची शिकार करतीलआजच्या युगात ज्या प्रकारे हवामानात बदल होत आहेत, ग्लोबल वार्मिंग वाढत आहे. त्यानुसार, पुढील विध्वंस हा समुद्रातूनच येणार आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासावरुन दिला आला. समुद्रात ऑक्सिजनची कमतरता असेल, पाणी पातळी वाढेल. हायड्रोजन सल्फाइडचे प्रमाण वाढत जाईल. समुद्रातील प्राणी पाण्यातून बाहेर येतील आणि माणसांची शिकार करतील. मग हळूहळू नवीन जीव जन्माला येतील. नवीन प्राणी आणि नवीन वनस्पती जन्माला येतील, असं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.सहाव्या सामूहिक विनाशाला सुरुवात मानवी वसाहतींवर नवीन प्राण्यांचं अतिक्रमण होईल. जंगलांचे स्वरूप बदलेल. पृथ्वीवर सहावा सामूहिक विध्वंस सुरू झाला आहे. याआधी मोठ्या प्रमाणावर विध्वंस होण्याच्या घटना नैसर्गिक होत्या. परंतु मानवी उपक्रमांमुळे हे घडत आहे. विविध प्रजाती नामशेष होण्याच्या वाटेवर आहेत. बायोलॉजिकल रिव्ह्यू जर्नलमध्ये शास्त्रज्ञांनी लिहिले आहे की, पृथ्वीवरील सुमारे १३ टक्के अपृष्ठवंशी प्रजाती गेल्या ५०० वर्षांत नामशेष झाल्या आहेत. ५०० वर्षांत १३ टक्के जीव नामशेषशास्त्रज्ञांनी सांगितले की, सुमारे १३ टक्के जीवजंतूंचा उल्लेख इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN) च्या धोकादायक प्रजातींच्या रेड लिस्टमध्ये आहे. इनव्हर्टेब्रेट प्रजातींची यादी पाहिल्यास, हे लक्षात येईल की आपण पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर जीवहानी पाहातो आहोत. हे सिद्ध करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी २०१५ च्या एका अभ्यासाचा हवाला दिला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मोलस्क पृथ्वीवरून नामशेष होतील.जमिनीवरील ७ % गोगलगायी नष्टइसवी सन १५०० पासून पृथ्वीवर आढळणाऱ्या गोगलगायींच्या संख्येपैकी ७ टक्के संख्या नष्ट झाल्या आहेत. हा जमिनीवर राहणारा अपृष्ठवंशी जीव आहे. समुद्रात हे प्रमाण खूप जास्त आहे. जर आपण जमीन आणि समुद्र एकत्रितपणे पाहिले तर या प्रजातीतील ७.५ ते १३ टक्के प्राणी नष्ट झाले आहेत. रेड लिस्टनुसार, पृथ्वीवरून ८८२ प्रजातींचे १.५० लाख ते २.६० लाख मोलस्क नष्ट झाले आहेत. मानवी उपक्रमामुळे सारं काही होतंयशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, जमिनीवर मानवी उपक्रम अधिक आहेत. त्यामुळे येथे नुकसान अधिक होत आहे. पण, समुद्रात असे का होत आहे, याचा अभ्यास करावा लागेल. मानव ही एकमेव अशी प्रजाती आहे जी जैविक प्रक्रियांमध्ये व्यत्यय आणू शकते किंवा त्या बदलू शकते. मानव ही एकमेव अशी प्रजाती आहे ज्यात भविष्यानुसार गोष्टी बदलण्याची क्षमता आहे, असंही शास्त्रज्ञांनी सांगितलं.पृथ्वीवर सतत होत असलेला नैसर्गिक विकास थांबवण्यात आणि वाढवण्यात मानवाची महत्त्वाची भूमिका आहे. हे निश्चित झाले आहे, की जर आपण विनाशाकडे जात आहोत, तर त्यात मानव जातीची सर्वात मोठी भूमिका आहे. ज्यानुसार पृथ्वीवर जीव मरत आहेत, याचा अर्थ पृथ्वीवर सहावा सामूहिक सुरू झाला आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/QtCbHWO
No comments:
Post a Comment