Breaking

Wednesday, March 8, 2023

VIDEO: केसरकरांचा नमस्कार, पण ठाकरेंचा कानाडोळा, विधिमंडळात उद्धव यांचे इग्नोराय नमः https://ift.tt/RLWjzlu

मुंबई: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. शिंदे गटाने भाजपसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यानंतरच हे पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. गेल्या काही महिन्यात शिंदे गटाचा बंड आणि त्यानंतर घडलेल्या एकदंरीत राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात रोज खटके उडू लागले आहेत. तर शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्हही शिंदे गटाकडे गेल्याने ठाकरे गट खूप नाराज आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सतत शिंदे गटातील नेत्यांवर टिकास्त्र सोडली जातात. पाहा व्हिडिओ -मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने या दोन्ही गटातील नेते एकमेकांच्या समोर येत आहेत. आजही असंच झालं. उद्धव ठाकरे आज दुपारी विधानभवन परिसरात आले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरेही होते. तर, उद्धव ठाकरे एन्ट्री करणार आणि तेवढ्यात समोर दीपक केसरकर होते. तेव्हा केसरकरांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार केला. पण, उद्धव ठाकरेंनी दुर्लक्ष केलं, त्यांनी दुसऱ्यांदा नमस्कार केला, मात्र तरीही उद्धव ठाकरेंनी बघितलं नाही. त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा दीपक केसरकरांनी नमस्कार केला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. यावेळी केसरकरांच्या चेहऱ्यावरील भाव सारं काही सांगून जात होते. तर, उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ आदित्य ठाकरे आले. केसरकरांनी त्यांनाही नमस्कार केला. पण, आदित्य ठाकरेंनी केसरकरांकडे सपशेल दुर्लक्ष केलं आणि तेथून निघून गेले. शिंदे गटाने बंड पुकारत उद्धव ठाकरेंचा हात सोडला. त्यानंतर त्यांनी भाजसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाणही ठाकरेंकडून हिरावून घेतलं. त्यामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेत हे आता राजकीय राहिलेले नाहीत तर ते वैयक्तिक झाले आहेत. त्याचाच प्रत्यय आज विधानभवनातील या घटनेवरुन प्रकर्षाने दिसून आला.


from Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times https://ift.tt/Z13t5kj

No comments:

Post a Comment